मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : सोमवार, 7 डिसेंबर 2015 (13:03 IST)

लग्नासाठी सँडिल खरेदी करताना....

लग्नाची तयारी होत आली. साडी, लहंगा, मेकअप, दागिने सर्व काही अरेंज झालाय आणि आता वेळ आलीय सँडिल घेण्याची. आणि लग्नासाठी सँडिल घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे.  
 
* लग्नाच्या दिवशी सर्वांची नजर आपल्यावर असेल आणि अशात आपली सँडिल आरामदायक नसली तर ते आपल्या चालीवरून कळून येईल. म्हणून सँडिल घेताना लक्षात ठेवा सँडिलचा रंग आपल्या परिधानाशी मॅच असला पाहिजे. 
 
यादिवशी कोणत्याही प्रकाराचा नवीन प्रयोग करायला नका जाऊ. 


 
कॉन्ट्रास्ट कलरही छान दिसत असले तरी निवडण्यात जराश्या चुकीमुळे लुक बिघडू शकतो.

लग्नातच नवीन सँडिल घालेन. अधिकश्या मुली हीच चूक करतात. लग्नापूर्वी नवीन सँडिल तीन-चार वेळा घालून पाहा. सँडिल घालून बाहेर नका निघू पण घरातल्या घरात फेऱ्याही लावा.  
 
पुष्कळदा नव्या सँडिल्स चावतात किंवा कितीही फिटिंगच्या असल्या तरी जास्त वेळ घातल्यावर आरामदायक वाटत नाही. अशात लग्नाच्या दिवशी फजीहत व्हायची.

* लग्नात एवढा खर्च करत असताना सँडिल घेताना मात्र कंजूसी करू नका. आणि हो फक्त सँडिलच्या दिसण्यावर न जाता ती मजबूत आणि चांगल्या क्वालिटीची आहे वा नाही याकडेही लक्ष असू द्या. 
 
सँडिलच्या आतला सोल स्लीपरी नसला पाहिजे ही गोष्ट लक्षात असू द्या.
 
लग्नाच्या दिवशी आपल्या लॉनमध्ये चालायला असेल तर पेंसिल ‍हिल्स किंवा पॉइंटेड सँडिल कामाचे नाही. अशात फ्लॅट, प्लेटफॉम किंवा वेजिस उत्तम पर्याय ठरेल. 


 
सँडिल घालण्यापूर्वी त्याचे सोल सँडपेपरवर रगडून घ्यावं.
 
सँडिल महागातले आणि ब्रॅडेड घेयचे आहे हे तर निश्चित आहे पण सँडिल निवडताना लक्षात असू द्या की हे आपल्याला लग्नानंतर ही वापरता आले पाहिजे.