गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

सोने, हिरे, मोती हे सुद्धा सौंदर्यवर्धक

NDND
मोत्यांमध्ये अ‍ॅंटीं-एजिंग (त्वचेला सुरकुत्यांपासून रोखणारे) वा रिमिनरालायझिंग (त्वचेत कमी होणाऱ्या खनिज पदार्थांची भरपाई) हे गुण असतात. मोती कॅल्श‍िअम तसेच कानकियोलिनपासून (शंख) तयार होतो. कॅल्शिअम मेटाबॉलिझमची क्षमता वाढविते. तर कोनकियोलिन हे अ‍ॅ‍मिनो अ‍ॅसिडसचा स्ञोत आहे. या अ‍ॅसिडमुळे त्वचेतील मॉयश्चर संतुलित रहाते. तर या दोन्हीमुळे त्वचा ताजीतवानी दिसते. म्हणूनच ही सौंदर्य प्रसाधने महागडी असूनही विकली जातात. महागडी असली ‍तरी त्याचे फायदेही भरपूर आहेत.

हिऱ्यात अ‍ॅंटी एजिंग तथा रिमिनरालायजिंग (त्वचेत कमी होणाऱ्या खनिज पदार्थांची भरपाई) हे गुण असतात.
त्वचा उजळविण्यासाठी सोने, हिरे, मोती यांचा उपयोग पूर्वीपासून केला जातो. सौंदर्य प्रसाधनांची वाढती लोकप्रियता व सौंदर्याबद्दल वाढती सतर्कता यामुळे विविध साधने बाजारात येत आहेत. अगदी जडी- बुटींपासून सोन्यापर्यंत प्रत्येकाचा उपयोग त्वचा सुंदर दिसण्यासाठी केला जात आहे. या सर्व गोष्टींच्या वापराची लोकप्रियता इतकी वाढली आहे की महिला यासाठी लागतील तितके पैसे मोजण्यासाठी तयार असतात.

NDND
मोठ-मोठी, नावाजलेली ब्यूटी ट्रिटमेंट सेंटर्स, ब्यूटी पार्लर यामध्ये महागड्या दरात गोल्ड, डायमंड आणि पर्ल फेशियल करण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. काही ठिकाणी वरील फेशियल करण्यासाठी इतकी जास्त किंमत वसूल केली जाते की त्यात सोने किंवा हिरे विकत घेता येईल. या सर्व ट्रीटमेंटचा हेतू महागड्या धातूंच्या व रत्नांच्या गुणांचा प्रयोग करून त्वचेची स्निग्धता कायम राखून तिला तजेला देणे हा असतो. हे कताना या महागड्या धातूंच्या अंगी असलेले गुण उपयोगात आणले जातात.

NDND
सोन्यात मुळात अ‍ॅंटी इनफ्लेटरी (सूज कमी करणारा) गुण असतो. तसेच सोने काहीही नुकसान न करता पोषक घटकांचा व्यवस्थित वापर करून त्याचे फायदे त्वचेपर्यंत पोहोचवितो. सोने फेशियल करता जास्त उपयोगी पडते. ही पध्दत आपल्या नर्व्ह सिस्टीमला उद्द‍ि‍पित करून प्रतिरोधक क्षमता वाढविते. तसेच त्वचा ताणली गेली तरी तिचे नुकसान होऊ देत नाही. त्याप्रमाणे हिऱ्यात अ‍ॅंटी एजिंग तथा रिमिनरालायजिंग (त्वचेत कमी होणाऱ्या खनिज पदार्थांची भरपाई) हे गुण असतात.