गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

अपत्य सुख आणि समृद्धीचा प्रतीक कासव

फेंगशुईमध्ये कासवाला शुभ मानले आहे. कासव घरात ठेवल्याने यश प्राप्ती होते. यासोबत पैसा येतो आणि घरात समृद्धी नांदते. कासव 200 वर्षांपेक्षा जास्त जगते म्हणूनच याला दीर्घकाळापर्यंत लाभ देणारे मानले आहे.
 
कासव ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेत ठेवायला हवं. कासव ठेवताना त्याचा चेहरा आतल्या बाजूला असावा तरच दिशा शुभ राहील. कधीही कासवाची जोडी ठेवू नये.
धन प्राप्ती हा उद्देश्य असल्यास क्रिस्टल कासव ठेवू शकता. तसेच अपत्य प्राप्तीसाठी मादा कासव, जिच्या पाठीवर लहान कासव असतं, घरात ठेवल्याने सकारात्मक परिणाम मिळते. असे कासव ठेवल्याने घरात नक्कीच पाळणा हलणार.