शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2015 (14:00 IST)

ऑफिसामध्ये फेंगशुई टिप्सचा वापर करा आणि सक्सेस मिळवा

फेंगशुईच्या माध्यमाने फक्त घरातील वास्तू दोषांना दूर करता येते असे नसून तुम्ही दुकान किंवा ऑफिसमध्ये देखील याचा उपयोग करून यश मिळवू शकता. खाली आम्ही तुम्हाला काही फेंगशुई टिप्स देत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी होऊ शकता.   
 
1. जर तुमच्या ऑफिसमध्ये लहान आणि उंच खिडक्या असतील जेथून काहीच दिसत नसेल तर तेथे लॅंडस्केप पोस्टरचा वापर करावा. 
2. जर तुमच्या कार्यालयाच्या खिडकीतून असे काही दिसत असेल जे बघायला तुम्हाला आवडत नसेल तर खिडकीला पडदा लावावा.  
3. जर खिडकीतून बाहेर एखादे सुंदर आणि प्रोत्साहन देणारे दृश्य दिसत असतील तर खोलीत एक मोठा आरसा लावणे उत्तम असते, यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहील.  
4. तुमच्या डेस्कला दाखवणारा आरसा सांकेतिक रूपेण तुमच्या कामाच्या वेगाला दुप्पट करू शकतो. आयच्या बाबतीत देखील हा तुमच्यासाठी योग्य असू शकतो. डेस्कला नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायला पाहिजे नाही तर हाच आरसा तुम्हाला नुकसान देखील पोहचवू शकतो.  
5. आपल्या व्यवसायात दबदबा बनवण्यासाठी व्यक्तीला अशा जागेवर बसायला पाहिजे जेथून दार स्पष्ट दिसून येईल, पण दाराच्या एकदम समोर बसणे उत्तम नाही आहे. जर एखादा व्यक्ती तुमच्या कार्यालयात चांगल्या स्थितीत नसेल तर याचा अर्थ असा आहे की व्यवसायाच्या उपक्रमावर त्याचे नियंत्रण नाही आहे. तेव्हा फेंगशुईचा वापर करून तुम्ही त्याचे सकारात्मक परिणाम बघू शकता.