शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 जून 2015 (16:27 IST)

फेंगशुई टिप्स : खिडकी जवळ पलंग ठेवणे शुभ नाही

वैवाहिक जीवनात सुख आणि शांती कायमची असावी, यासाठी फेंगशुई (चीनचा वास्तू)मध्ये काही टिप्स देण्यात आल्या आहेत. या टिप्सच्या प्रयोग केल्याने नवरा बायकोमधील प्रेम वाढत. येथे आम्ही जाणून घेऊ नवरा बायकोतील जीवनात सुख वाढवणारे काही फेंगशुईचे उपाय...
 
फेंगशुईची मान्यता - फेंगशुईची मान्यता आहे की आमच्या आजू बाजूस अनंत ऊर्जा आहे. ही ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकाराची असते आणि ही ऊर्जा जीवनाच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करते. फेंगशुईच्या नियमांचे पालन करून नकारात्मक ऊर्जेला निष्क्रिय करू शकता आणि सकारात्मक ऊर्जेला वाढवू शकता.

खिडकीजवळ पलंग नसावा 
नवरा बायकोला बेडरूममध्ये पलंग किंवा गादी खिडकीजवळ नाही लावायला पाहिजे. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि परस्परातील असहयोगाची प्रवृत्ती वाढते. जर खिडकी जवळ गादी लावावी लागली तर आपले डोके आणि खिडकीच्या मध्ये पडदा जरूर लावायला पाहिजे. याने नकारात्मक ऊर्जेच्या प्रभाव तुमच्या नात्यात दुरावा आणत नाही.  
पलंगाच्या खाली कुठलेही सामान ठेवू नये  
नवरा बायकोला पलंगाच्या खाली कुठल्याही प्रकाराचे सामान ठेवणे वर्जित आहे. पलंगाच्या खालची जागा मोकळी ठेवायला पाहिजे ज्याने सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते.  
बेडच्या चारीबाजून ऊर्जा बीन बाधेची प्रवाहित होईल.  
ज्या पलंगावर दंपती झोपतात त्यावर इतर कुठल्याही व्यक्तीला झोपू देऊ नये.  
शयन कक्षात प्रवेश द्वाराच्या भिंतीला लागून तुम्ही तुमचा बेड लावला असेल तर बेड तेथून हालवून दुसरीकडे लावावा. असे केले नाहीतर नात्यात तणाव वाढतो.  
पलंग नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. याने प्रेमात वाढ होते.