शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 11 जून 2014 (17:39 IST)

फेंगशुई प्रमाणे उंटाबद्दल काय मान्यता आहे!

जर तुम्हाला तुमच्या करियरमध्ये अडचणी येत असतील आणि प्रयत्न करून ही यश मिळत नसेल तर तुम्ही उंटाची मदत घेऊ शकता.  

चिनी वास्तू विज्ञान फेंगशुईनुसार उंट नोकरी, व्यावसायिक आणि आर्थिक अडचणींना दूर करण्यास मदत करतो.  

फेंगशुईनुसार उंटाच्या मूर्तीला ऑफिस आणि घर दोन्ही जागांवर ठेवू शकता. याने प्रगतीत येणार्‍या अडचणींवर मात करता येईल.  

ज्यांची नोकरी व व्यवसाय ठीक ठाक सुरू असला तरी त्यांना समस्या आणि विरोधकांच्या प्रभावातून बचाव करण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये उंट ठेवायला पाहिजे.  

घरात उंटाची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती सामान्य राहते. धन संबंधी समस्यांमध्ये कमतरता येते, पण उंटाचे जोडपे ठेवले तर धन येण्याचा वेग ही वाढतो आणि आर्थिक स्थिती उत्तम होते. फेंगशुईनुसार उंटाचा सकारात्मक प्रभाव तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला उत्तर-पश्चिमात ठेवण्यात येतो.  

फेंगशुईमध्ये उंटाला घेऊन अशी मान्यता आहे की उंट दृढता आणि संघर्षाचा प्रतीक आहे. मरुभूमीत मनुष्याला एका जागेवरून दुसर्‍या जागेपर्यंत घेऊन जाण्याशिवाय हे मनुष्याला सावली आणि दुसर्‍या इतर गोष्टींमध्ये मदत करतो. मरुभूमीच्या अवघड रस्त्यांमध्ये हा एक कुशल मार्गदर्शकाचा काम देखील करतो, म्हणून फेंगशुईत असे मानले जाते की उंटाची मूर्ती आणि फोटो जीवनातील येणार्‍या प्रत्येक अडचणींवर मात करण्यास सक्षम असतो.