शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

सुख-संपत्तीसाठी मुख्य दाराजवळ ठेवा हे....

हसणारा बुद्धा: हसणारा बुद्धा घरात संपत्ती, आर्थिक लाभ आणि यशाला आमंत्रित करतो. मुख्य दाराजवळ बुद्धा ठेवल्याने आपण घरात येताना तो समोरच दिसले. हसणारा बुद्धा बाथरूम किंवा बेडरूममध्ये ठेवू नये.


विंड चाइम:  विंड चाइम घरातील मुख्य दारावर लावयला हवी. जीवनात सकारात्मक आवाजांच्या लाटा आणि भाग्योदयासाठी हे उत्तम आहे. या घंट्या आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये शिरत असणार्‍या हानिकारक वेव्जला सकारात्मक वेव्जमध्ये बदलून देतात जे आपल्यासाठी फायदेशीर आहेत.


बेडूक: आपल्या मुख्य दाराच्या तिरप्या बाजूला तीन पायांचा बेडूक ठेवणे अत्यंत शुभ ठरेल. याने आपल्या उत्पन्न आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. हे बेडूक किचन किंवा बेडरूममध्ये ठेवणे टाळावे.


ड्रॅगन हॉर्स: चिनी पुराणानुसार ची लिन, ड्रॅगन हॉर्स हे सर्वात शक्तिशाली नशीबवान प्रतिमा आहे. याने आरोग्य सुख-समृद्धी लाभते. ची लिन लिव्हिंग रूममध्ये प्रवेश दाराच्या जवळ ठेवावे. ची लिन बेडरूम, किचन किंवा बाथरूममध्ये ठेवू नये.

 

घोडे: फेंगशुईनुसार धावणार्‍या घोड्यांचे चित्र लिव्हिंग रूम अर्थात घरातील प्रवेश दाराजवळ लावायला हवे. याने नशीब उजळतं आणि संपत्ती वाढते. तसेच घोड्यांच्या चेहर्‍यावर उत्साह किंवा खुशी दिसली पाहिजे. घोडे रागात पळत असल्यासारखे दिसता कामा नये.