testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे!

ganesh
वेबदुनिया|
ND

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे । ।1।।

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ।।धृ।।

विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा । अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डनृत्य करिसी तातक् धिम ताथा ।।जय।।2।।

विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसा‍वीनंदन गातो कवितांशी ।।जय।।3 ।


यावर अधिक वाचा :