testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वट सावित्री पूजा: संपूर्ण विधी

वटसावित्री पूजा
कशी करावी, जाणून घ्या पूर्ण विधी
महादक्षिणा, पूजासाहित्य व ब्राह्मणदक्षिणा
हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध-अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपार्‍या 12, फळे, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम, सौभाग्यवायनाचे साहित्य- तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या 2, सुटे पैसे.. सौभाग्यवायन देणे शक्य नसल्यास दक्षिणा द्यावी.

अथ पूजाप्रारंभ
प्रथम वडाला सूत लावावे. आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा ( विड्याची पाने दोन, त्यावर सुटे पैसे व एक सुपारी) ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना म्हणजे आपल्या उपाध्यायांना नमस्कार करुन पाटावर बसावे. नंतर पूजेला सुरुवात करावी. पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे. चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे.

१. श्री केशवाय नमः । २. श्री नारायणाय नमः । ३. श्री माधवाय नमः ।
चौथे नाव उच्चारतांना ‘नमः’ या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविन्दाय नमः । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत.
५. श्री विष्णवे नमः । ६. श्री मधुसूदनाय नमः । ७. श्री त्रिविक्रमाय नमः । ८. श्री वामनाय नमः । ९. श्री श्रीधराय नमः । १०. श्री हृषीकेशाय नमः । ११. श्री पद्मनाभाय नमः । १२. श्री दामोदराय नमः । १३. श्री सङ्कर्षणाय नमः । १४. श्री वासुदेवाय नमः । १५. श्री प्रद्मुम्नाय नमः । १६. श्री अनिरुद्धाय नमः । १७. श्री पुरुषोत्तमाय नमः । १८. श्री अधोक्षजाय नमः । १९. श्री नारसिंहाय नमः । २०. श्री अच्युताय नमः । २१. श्री जनार्दनाय नमः । २२. श्री उपेन्द्राय नमः । २३. श्री हरये नमः । २४. श्री श्रीकृष्णाय नमः ।।

येथून पुढे ध्यान करावे. ते असे- हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे व आपली दृष्टी आपल्यासमोरील देवाकडे लावावी.

ॐ श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । मातापितृभ्यां नम: । श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम: । निविघ्ननमस्तु ।

सुमुश्रषैकदंतश्च कपिलो गजकर्णक: । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप: । धूम्रकेतुर्गणणाध्यक्षो भालचंद्रो गजानन: । द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणुयादपि । विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते । शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं
।। प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये
। सर्व मंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके
। शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ।। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तोषाममंगलम् । येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरि: । तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंदा्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि । लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय: । येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दन: । विनायकं गुरुं भानुं ब्रह्माविष्णुमहेश्वरान् । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये । अभीपिसतार्थसिद्धयर्थं पूजितो य: सुरासुरै: सर्वविघ्नहरस्तमै गणाधिपतये नम: । सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा: दिशंतु न: सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दना: । श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत वाराहकल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुक नाम संवत्सरे उदगयने ग्रीष्मऋतो ज्येष्ठे मासे शुक्लपक्षे पौर्णिमास्यां तिथौ अद्य वासर: वासरस्तु अमुकवासरे अुमकदिवसनक्षत्रे अमुस्थिते वर्तमाने चंद्रे अमुकस्थिे श्रीसूर्ये अमुकस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु। यथायथं राशिस्थानस्थितेषु ग्रेहेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे ऋवंगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: सकलशास्त्रपुराणोक्तफलप्राप्तर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम इह जन्मनि जन्मांतरे च अखंडित- सौभाग्य-पुत्रपौत्रादि- अभिवृद्धिधनधान्यदीर्घायुष्यादि-सकल-सिद्धिद्वारा सावित्रीव्रतांगत्वेन प्रतिवार्षिकविहितं ब्रह्मासावित्री-प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्यै: षोडशोपचारपूजनमहं करिष्ये ।।
उजव्या हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.
तत्रादौ निर्विघ्नतासिद्धयर्थं महागणपतिपूजनं कलशघंटापूजनं च करिष्ये ।। (नंतर तांदळावर सुपारी ठेवून गणपतीचे ध्यान करावे.) वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम:प्रभ || || निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्व्दा || ( या मंत्राने गणपतीवर अक्षता वाहाव्या.) श्रीऋद्धिबुद्धिसिद्धिसहितं साङंग सपरिवारं सायुधं सशक्तिकं गणपतिं अस्मिन् पूगीफले. ॐ भूर्भुवःस्वर्महागणपतये नमः आवाहयामि । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि । पादयोः पाद्यं समर्पयामि ॥ ( या मंत्राने पळीभर पाणी घालावे.) महागणपतये नम: अर्घ्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने गंधाक्षतामिश्रित पाणी घालावे.) महागणपतये नम: आचमनीयं समर्पयामि ।। ( या मंत्राने पळीभर पाणी घालावे.) महागणपतये नम: स्नानं समर्पयामि ।। ( या मंत्राने देवाला स्नान घालावे.) महागणपतये नम: सुप्रतिष्ठितमस्तु । महागणपतये नम: वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रे समर्पयामि ।। (या मंत्राने कापसाची दोन वस्त्रे वाहावी.) महागणपतये नम: यज्ञोपवीतं समर्पयामि ।। ( या मंत्राने जानवे वाहावे.) महागणपतये नम: विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । (गणपतीला गंध लावावे.) महागणपतये नम: अलंकारार्थे अक्षतान्समर्पयामि । (अक्षता वाहाव्या.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम:
हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि । (हळदकुंकू वाहावे.) महागणपतये नम: सिंदूरं परिमलद्रव्याणि च समर्पयामि । (या मंत्राने शेंदूर, अष्टगंध व अरगजा इत्यादी सुवासिक द्रव्ये वाहावी.) महागणपतये नम: कालोद्भवपुष्पणि दूर्वाकुरांश्च समर्पयामि । (गणपतीला तांबडी फुले व दुर्वा वाहाव्यात. ) महागणपतये नम: धूपं दीपं च समर्पयामि । (या मंत्राने उदबत्ती ओवाळून नंतर गणपतीला निरांजन ओवाळावे.) महागणपतये नम: नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि । (पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर गूळखोबरे ठेवून त्याचा नैवेद्य पुढील मंत्राने गणपतीला दाखवावा.) *ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ।ॐ ब्रह्मणे स्वाहा । नैवेद्यमध्येपानीयं समर्पयामि । (एक पळीभर पाणी ताम्हनात सोडावे व वरील मंत्राने पुन्हा नैवेद्य दाखवावा.) उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । (असे म्हणून तीन पळ्या पाणी ताम्हनात सोडावे.) मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णनिष्क्रयदक्षिणां समर्पयामि ॥ (या मंत्राने विडा, सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पाणी घालवे.) महागणपतये नम: मंत्रंपुष्पं समर्पयामि । (गणपतीला फूल वाहावे व हात जोडून पुढील मंत्रांनी प्रार्थना करावी.) नमस्करोमि । कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि ।विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक। महागणपतये नम: प्रार्थनां समर्पयामि । अनेन कृतपूजनेन महागणपति: प्रीयताम ॥ (असे म्हणून पाणी सोडावे नंतर तांब्याची पूजा करावी.) कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मूलेतस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मात्र गणा स्मृताः। कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्विपा वसुंधरा, ऋग्वेदो यजुर्वेदो सामगानां अथर्वणाः अङेश्च सहितासर्वे कलशन्तु समाश्रिताः। अत्र गायत्रीसावित्री शांतिपुष्टिकरी तथा । आयांतु देवपूजार्थ दुरितक्षयकारकाः । गंगे च यमुने चैव गोदावरिसरस्वती । नर्मदे सिंधू कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥ कलशाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतः पुष्पं समर्पयामि । ( या मंत्राने तांब्याला गंध-अक्षता-फूल- लावावे. नंतर घंटेची पूजा करावी.) आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलाञ्छनम् ॥ घंटादेव्यै नम: ।। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। ( या मंत्राने घंटेला गंध, अक्षता व फूला लावावे.) घंटानादं कुर्यात् ( घंटा वाजवावी.) अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स: बाह्याभंतर: शुचि:।। पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत् ।। ( फुलाने पूजेच्या साहित्यावर पाणी शिंपडून नंतर आपल्याला अंगावर शिंपडावे.) अथ ध्यानम् ।। ( हातात अक्षता घेऊन ब्रह्मासावित्रीचे ध्यान करावे.) उपवतीधरं देवं साक्षसूत्रकमंडलुं वामोत्संगगतां तस्य सावित्री ब्रह्मण: प्रियाम् ।। आदित्यवर्णां धर्मज्ञां साक्षमालाकरां तथा । धर्मराजां पितृपतिं भूतानां कर्मसाक्षिणम् ।।
वटमूले ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। ध्यायामि ( अक्षता वाहाव्या) देवि देवि समागच्छ प्रार्थयेsहं जगन्मये ।। इमां मया कृतां पूजां गृहाण सुरसत्तमे । ब्रह्मसावित्रीभ्यां नम: । आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ( या मंत्राने अक्षता वाहाव्या) सुचारुशीतलं दिव्यं नानागंध समन्वितम् ॥ पाद्यं गृहाण देवेशि महादेवि नमोस्तु ते ॥ श्रीउमा महेश्वराभ्यां नमः ॥ पादयोः पाद्यं समर्पयामि ॥ ( या मंत्राने पळीभर पाणी घालावे . ) श्रीपार्वति महाभागे शंकरप्रियवादिनि ॥ अर्घ्यं गृहाण कल्याणि भर्त्रा सह पतिव्रते ॥ श्रीउमामहेश्वराभ्यां नमः ।। अर्घ्य समर्पयामि ( या मंत्राने गंध, अक्षता, व फूलमिश्रित पाणी घालावे) गंगाजलं समानीतं सुवर्णकलषस्थितम्। आचम्यतां महाभागे रुद्रेण सहितेनधे ।। ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। आचमनीयं समर्पयामि ( पळीभर पाणी सोडावे) दध्याज्यमधुसंयुक्तं मधुपर्कं मयाऽऽहृतम् । दत्तं गृहाण देविशि भवपाशविमुक्तये ।। मधुपर्कं समर्पयामि ( या मंत्राने दही व मध एकत्र करुन वाहावे.) गंगासरस्वतीरेवापयोष्णीनर्मदाजलै:।। स्नापितासी मया देवि तथा शान्तिं कुरुष्व मे।। ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। स्नानीयं समर्पयामि ( या मंत्राने देवाला पाणी घालावे.) पंचामृतै: स्नपरिष्ये ( ताम्हाणात पाणी सोडावे) सौरभेयं महदिव्यं पवित्रं पुष्टिवर्धनम् ।। स्नानार्थ ते मयादत्तं दुग्धं गृहीष्व ते नम: ।। ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। पय: स्नानं समर्पयामि ।। पय: स्नानानंतरं शुद्धोदरकस्नानं समर्पयामि ( देवाला दूध घालावे नंतर दोन पळ्या पाणी घालावे)
सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।। ( देवाला अक्षता वाहाव्या) जगदेतद्दधासित्वं त्वमेव जगतां हितम् ।। मया निवेदितं भक्त्या दधि स्नानाय गृह्यताम् ।। ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। दधिस्नानं समर्पयामि ।। दधिस्नानानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। शुद्धोदकस्नानानंतर आचमनीयं समर्पयामि ।। ( या मंत्राने दही घालून नंतर दोन पळ्या पाणी घालावे.) सकलपूजार्थे अक्षता समर्पयामि । ( अक्षता वाहाव्या) घृतकुंभ- समायुक्तं घृतयोने घृतप्रिये ।। घृतभुक्घृतधामासि घृतस्नानाय गृहय्ताम् ।। ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। घृतस्नानं समर्पयामि ।। घृतस्नानानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। शुद्धोकस्नानानंतर आचमनीयं समर्पयामि (देवाला तूप लावून नंतर दोन पळ्या पाणी घालावे) सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।। ( देवाला अक्षता वाहाव्या) सर्वोषधिसमुत्पन्नं पीयूषसहृशं मधु । स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर । श्री-नमः। मधुस्नानं समर्पयामि । मधुस्नानंतर शुद्धोदकस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानानंतरं आचमनीयं समर्पयामि ।। ( देवाला मध लावून दोन पळ्या पाणी घालावे) सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि ।। (अक्षता वाहाव्या)
इक्षुदंडसमुत्पन्ना रस्या स्निग्धतरा शुभा । शर्करेयं मया दत्ता स्नानार्थं प्रतिगृह्यताम् । श्रीशिवमंगलागौरीभ्यां नमः । शर्करास्नानं समर्पयामि ॥ शर्करास्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥ शुद्धोदकस्नानानंतरं आचमनीयं समर्पयामि ।। (देवाला साखर लावावी। नंतर देवाला दोन पळ्या पाणी घालावे.) सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।। ( देवाला अक्षता वाहाव्या) कर्पूररैलाकुंकुमादि सुंगधिद्रव्यसंयुतम् ।। गंधोदकमुमे शुद्धं स्नानार्थ प्रतिगृह्यताम् ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। गंगोधकस्नानं समर्पयामि ।। गोधदकस्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि ( देवाला गंधमिश्रित पाणी घालावे नंतर पळीभर पाणी घालावे) ब्रह्मसावित्रीभ्यां नम: ।। नाममंत्रेण गंधादिना संपूज्य ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ( देवाला गंध, अक्षता आणि फूला वाहावी) ब्रह्मा‍सावित्रीभ्यां नम: ।। हरिद्रांकुंकुमं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ( देवाला उदबत्ती ओवाळावी) ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। दीपं समर्पयामि ( देवाला दिवा ओवाळावा) ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। नैवेद्यार्थ पयोनैवेद्यं समपर्ययामि ।। ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा । ( या मंत्राने पाण्याने चौकोनी मंडळ करुन त्यावर दुधाची वाटी ठेवून नैवेद्य दाखवावा, नंतर पुढील मंत्र म्हणत ताम्हणात पाणी सोडून पुन्हा नैवेद्य दाखवावा) मध्येप्राशनार्थे पानीयं समर्पयामि ॥ प्राणाय नमः ॥ अपानाय नमः ॥ व्यानाय नमः ॥ उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ ब्रह्मणे नमः ॥ उत्तरापोशनं समर्पयामि ॥ ह्स्तप्रक्षालनं समर्पयामि ॥ मुखप्रक्षालनं समर्पयामि ॥ करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । ( तीनदा ताम्हणतात पाणी सोडून देवाला गंध लावावे.) ब्रह्मा सावित्रीभ्यां नम: मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्ण निष्क्रयदक्षिणां समर्पयामि ( देवापुढे विड्यावर दक्षिणा ठेवून त्यावर पाणी सोडावे) ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। मंत्रपुष्पे समर्पयामि । नमस्करोमि ।। ( देवाला फूल वाहून नमस्कार करावा) अनेन कृतपंचोपचारपूजनेन तेन ब्रह्मसावित्री प्रीयताम् (ताम्हणात पळीभर पाणी सोडावे) उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् । ( निर्माल्य उत्तर दिशेला टाकून नंतर देवावर अभिषेक करावा.)

महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी। स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः।। अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्। ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः।। १।।
अतीतः पंथानं तव च महिमा वांमनसयोः। अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि।। स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः। पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः।। २।।
मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः। तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम्।। मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः। पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता।। ३।।
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्। त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु।। अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं। विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः।। ४।।
किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं। किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च।। अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः। कुतर्कोऽयं कांश्चित् मुखरयति मोहाय जगतः।। ५।।

अमृताभिषेकोस्तु शांति:पुष्टीस्तुष्टिश्चास्तु। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: । महाभिषेकं समपर्ययामि । स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि । वरील मंत्राने देवावर अभिषेक केल्यावर आचमना‍करिता एक पळीभर शुद्ध पाणी घालावे. काश्मीरागरुकस्तूरी कर्पूंरयल-यान्वितम् । उद्धर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् । (देवाला सुवासिक तेल लावून पाण्याने स्नान घालावे). सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे ।
मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम् । ब्रह्मासावित्रीभ्यां नम: । वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि । ( देवाला कापसाची वस्त्रे वाहावी) मंत्रमयं मया दत्तं परब्रह्ममयं शुभं उपवीतमिदं सूत्रं गृहाण जगदंबिके ॥ ब्रह्मणे नमः यज्ञोपवीतं समर्पयामि ॥ ( या मंत्राने देवाला जानवे वाहावे . ) ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( देवाला गंध लावावे) रंजिता: कुंकुमौघेन अक्षताश्चातिशोभना: ।। भक्त्या समर्पितास्तुभ्यं प्रसन्न भव पार्वती ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। ( देवाला अक्षात वाहाव्या) हरिद्रां कुंकुमं चैव सिन्दूरं कज्जलान्वितम। सौभाग्यद्रव्यसंयुक्तं ग्रहाण परमेश्वर॥ ऊँ उमामहेश्वराभ्याम नम: सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि।
( देवीला हळदकुंकू वाहावे) नवरत्नादिभिर्बद्धां सौवर्णेन च तंतुभिः । निर्मितां कंचुकी भक्त्या गृहाण परमेश्वरि । श्रीशिवमंगला गौरीभ्यां नमः कंचुकीं समर्पयामि । ( या मंत्राने कंचुकीबद्दल अक्षता वाहाव्या . ) पट्टसूत्रभवं दिव्यं स्वर्णादिमणिभिर्युतम् ॥ सौमंगल्याभिवृद्धयर्थं कंठसूत्रं ददामि ते ॥ सावित्र्यै नम: ।। कंठसूत्रं समर्पयामि ।। (देवीला गळेसरी वाहावी) ताडपत्राणि दिव्याणि विचित्राणि शुभानि च । कराभरणयुक्तानि मातस्तत्प्रतिगृह्यताम् ॥ सावित्र्यै नमः ताडपत्रानि समर्पयामि ॥ (देवीला ताडपत्र वाहावे) सुनीलभ्रमराभासं कज्जलं नेत्रमंजनम् ॥ मया दत्तमिदं भक्त्या कज्जलं प्रतिगृह्यताम् । सावित्र्यै नमः ॥ कज्जलं समर्पयामि । ( या मंत्राने देवीला काजळ लावावे . ) विद्युदरुणसंकाशं जपाकुसुमंसन्निमं ॥ सिंदुरं ते प्रदास्यामि सौभाग्यं देहि मे चिरम् ॥ श्रीउमायै नमः सिंदुरं ते प्रदास्यामि सौभाग्यं देहि मे चिरम् ॥ सावित्र्यै नमः सिंदूरं समर्पयामि ॥ ( या मंत्राने देवीला शेंदूर वाहावा) स्वभावसुंदरांगि त्वं नानारत्नादिभिर्युता ।। भूषणानि विचित्राणि प्रीत्यर्थं प्रतिगृह्याताम् ।। सावित्र्यै नम: ।। आभारणानि समर्पयामि ।। ( या मंत्राने आभरणाबद्दल अक्षता वाहाव्या) नानासौगंधिकं द्रव्यं चूर्णीकृत्वा प्रयत्नत: ।। ददामि ते महा‍देवि प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् ।। सावित्र्यै नम: ।। नानपरिमलद्रव्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने बुक्का, अष्टगंधादी वाहावे)
करवीरैर्जातिकुसुमैश्चंपकैर्बकुलै: शुभै: ।। शतपत्रेश्च कल्हारैरर्चयेत् परमेश्वरि ।। सेवंतिकाबकुलचंपकपाटलाब्जै: पुन्नागजातिकरवीरसालपुष्पै: बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभि: त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद । नानाविधानि पुष्पाणि अनेकै: पुष्पजातिभि: ।। मया समर्पितानि त्वं गृहाण परमेश्विरि ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। ऋतुकलोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।। ( देवाला नान प्रकाराची फुले वाहवी)

अथांग पूजा
नाममंत्राने अवयवांना उद्देशून देवाला अक्षता वाहाव्या

सावित्र्यै नम: पादो पूजयामि । वटप्रियायै नम: जघे पूजयामि । भूतधारिण्यै नम: उदरं पूजयामि । गायत्र्यै नम: कंठं उदरं पूजयामि । ब्रह्ण: प्रियायै नम: मुखं उदरं पूजयामि । सौभाग्यदात्र्यै नम: शिर: उदरं पूजयामि । ब्रह्मासावित्रीभ्यां नम: सर्वांगं उदरं पूजयामि । त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुरायुधं । त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ १॥ त्रिशाखैः बिल्वपत्रैश्च ह्यच्छिद्रैः कोमलैः शुभैः ।
तव पूजां करिष्यामि ।। अर्पयामि सदाशिव ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम:
।। बिल्वपत्राणि समर्पयामि ( देवाला बेलाची पाने वाहावी) देवद्रुमरसोद्भुत कृष्णागरु समन्वित: आनीतोयं मया धूपो भवानि प्रतिगृह्याताम् ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। धूपं समर्पयामि।। ( देवाला उदबत्ती ओवाळावी) त्वं ज्योति: सर्वदेवानां तेजसां तेज उत्तमम् । आत्मज्योति: परंधाम दीपोऽयं प्रतिगृह्याताम् ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावी) अन्नं चतुर्विधं चारुरसै: षडभि समन्वितम्।। भक्ष्य-भोज्य-समायुक्तं नैवेद्यं प्रतिगृह्याताम् । ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। रंभाफलादि नैवेद्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने नैवद्य दाखवा) ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा । नमस्ते देवदेवशि सर्वतृप्तिकरं परम् मया निवेदितं तुभ्यं गृहाण जलमुत्तमम् ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। मध्येपानीयं समर्पयामि।। ( ताम्हणात पळीभर पाणी सोडावे. नंतर वरील सहा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा) मलयाचलसंभूतं कर्पूंरण समन्वितम्।। करोद्वर्तनकं चारु गृह्यतां जगत:पते ॥ ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। ( गंध लावावे) कर्पूरैलालवंगादि तांबूलीदलसंयुतम् । क्रमुकस्य फलं चैव तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥ ब्रह्मासावित्रीभ्यां नम: तांबूलं समर्पयामि ॥ ( या मंत्राने विडा ठेवावा) इदं फलं मया देवि स्थापित पुरतस्तव:। तेन से सफलावप्तिर्भवेज्जनमनि जन्मनि॥ ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। फलानि समर्पयामि ।। ( या मंत्राने खारीक, बदाम, फळे ठेवावी) हिरण्यगर्भगर्भस्थं देवबीजं विभावसों:। अनन्तपुण्यफलदमत: शांति प्रयच्छ मे।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि । ( या मंत्राने दक्षिणा ठेवावी) वज्रमाणिक्यवैडूर्यमुक्ता- विदुममंडितम् ।। पुष्परागसमायुक्तं भूषणं प्रतिगृह्यताम्‌ ॥ ब्रह्मासावित्रीभ्यां नम: । सर्वोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि । ( या मंत्राने अक्षता वाहाव्या) चंद्रादित्यो च धरणी विद्युद्ग्निंस्तर्थव च | त्वमेव सर्वज्योतीष आर्तिक्यं प्रतिगृह्यताम ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। नीरांजनं समर्पयामि ।। ( या मंत्राने निरांजन ओवाळावे, नंतर कापूर लावून ओवाळावे) नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।। उमाकांताय शांताय शंकराय नमो नमः ॥ ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। नमस्कारं समर्पयामि । ( या मंत्राने नमस्कार करावा . ) यानि कानि च पापानि ब्रह्महत्यासमानि च ।। तानि सर्वाणि नश्युंत प्रदक्षिणपदे पदे। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। प्रदक्षिणां समर्पयामि ।। ( या मंत्राने प्रदक्षिणा घालाव्या) विद्याबुद्धिधनैश्चर्यपुत्रपौत्रादिसंपद: ।। पुष्पांजलिप्रदानेन देहि मे ईप्सितं वरम् ।। ब्रह्मासावित्रीभ्यां नम: ।। मंत्रपुष्पं समर्पयामि ।। (या मंत्राने फुले वाहावी.) वटसावित्री- व्रतांगभूतं अर्घ्यप्रदानं करिष्ये ( ताम्हणात उदक सोडावे. पुढील तीन मंत्रानी गंध, अक्षता, फूल, पैसा, सुपारी घेऊन ताम्हणात पाण्यासह प्रत्येक मंत्राला एक अर्घ्य याप्रमाणे तीन अर्घ्ये सोडावीत.) ओंकारपूर्वके देवि सर्वदु:खनिवारिणि ।। देवमातर्नमस्तुभ्यं सौभाग्यं च प्रयच्छ मे । सावित्र्यै नम: अर्घ्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने पहिले अर्घ्य सोडावे)
पतिव्रते महाभागे ब्रह्माणि च शुचिस्मिते ॥ दृढव्रते दृढमते भर्तुश्च प्रियवादिनी ।। सावित्र्यै नम: अर्घ्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने दुसरे अर्घ्य सोडावे) अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते। पुत्रान्‌ पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते॥ सावित्र्यै नम: अर्घ्यं समर्पयामि ।। ( या मंत्राने तिसरे अर्घ्य सोडावे) पुढील मंत्राने फूल घेऊन हात जोडून प्रार्थन करावी. वटसावित्र्यै नमोऽस्तुते सशिवे भक्तवत्सले ।। संसारभयभीताऽहं त्वमेव शरणं मम ।। जन्मजन्मनि सौभाग्यमक्षय्यं देहि मेऽव्यये ॥ रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।। पुत्रान् देहि धनं देहि, सर्वान् कामाँश्च देहि मे।। अन्यथा शरणं नास्ति, त्वमेव शरणं मम । तस्मात्कारुण्यभावेन, रक्ष रक्ष परमेश्वरि: ॥ ब्रह्म- सावत्रिभ्यां नम: ।। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि ( या मंत्राने देवाला फुले वाहावी) यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु । न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम् ॥ अनेन यथाज्ञानेन कृतपूजनेन तेन ब्रह्मासावित्र्यो प्रीयेताम् (या मंत्राने हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे) अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण - विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: सकलशास्त्र- पुराणोक्तफलप्रीप्त्यर्थं ब्रह्मसावित्रोव्रतपूजासांगतासिद्धयर्थ ब्राह्मणाय सौभाग्यवायनप्रदानं करिष्ये ।। तदंगं वायनपूजनं च करिष्ये ।। (हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे) वायनदेवतायै नमः । समस्तोपचारार्थे गंधाक्षतापुष्पं हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि॥ (आरंभी सांगितल्याप्रमाणे सौभाग्य वायनावर गंध, अक्षता, फूल व हळद कुंकू वाहावे नंतर पुढील मंत्राने ब्राह्मण पूजा करावी) महाविष्णुस्वरुपिणे ब्राह्मणाय इदमासनम् । स्वासनम् ॥ इदं पाद्यम् ॥ सुपाद्यम् ॥ इदमर्घ्यम् ॥ अस्त्वर्घ्यम् ॥ इदमाचमनीयम् ॥ अस्त्वाचमनीयम् ॥ गंधःपातु ॥ सौमंगल्यं चास्तु ॥ अक्षताः पांतु ॥ आयुष्यमस्तु ॥ पुष्पं पातु सौश्रेयसमस्तु ॥ तांबूलं पांतु । ऐश्वर्यमस्तु । दक्षिणाः पांतु । बहुदेयं चास्तु । दीर्घमायः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटीयुगधारिणे नम: ।। सकलाराधनै: स्वचर्चितमस्तु ।। अस्तु सकलाराधनै स्वर्चितम् ( वरील मंत्राने ब्राह्मणाला गंध, अक्षता, फूल व दक्षिणा देऊन हातावर पाणी सोडावे. नंतर ब्राह्मणाच्या मस्तकावर अक्षता वाहून नमस्कार करावा)

नंतर पुढील मंत्राने ब्राह्मणाला सौभाग्यवायन द्यावे

वायनमंत्रउपायनमिदं देवि व्रतसंपूर्तिहेतुत: ।। वायंन द्विजवर्याय सहिरण्यं ददाम्यहम् ।। इदं सौभाग्यवायनप्रदानं सदक्षिणाकंसतांबूलं अमुकशर्मणे ब्राह्मणाय तुभ्यमहं संप्रददे ।। प्रति गृह्यताम् ।। प्रतिगृह्मामि ।। तेन ब्रह्मासावित्र्यौ प्रीयेताम् ( या मंत्राने ब्राह्मणाला सौभाग्यवायन देऊन ब्राह्मणाच्या हातावर पळीभर पाणक्ष घालून नमस्कार करावा) अनेन वायानप्रदानेन श्रीब्रह्मासावित्र्यौ प्रीयेताम् ।।

। तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।
। इति वटसावित्रीपूजा समाप्त ।


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

national news
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

national news
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

national news
सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...

Kumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...

national news
प्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...

देव तिळी आला

national news
पृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...