गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण
Written By वेबदुनिया|

मल्हारी मार्तंडाचा जागर

WDWD
मराठी कुटुंबात शुभकार्य, लग्न, मौज व कुलाचार यांना महत्त्व असते. अनेक कुटुंबात मल्हार मार्तंडांच्या पूजनासोबत चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र उत्सव होत असतो. यंदा 4 डिसंबरला चंपाषष्टी आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा केला जात आहे.

मार्तंड म्हणजे सूर्य, त्याला शैवपंथी खंडोबा, वैष्णवी विठ्ठलाची व आदिशक्ति म्हाळसा देवीची महाराष्ट्रातील घरा-घरात पूजा केली जाते. महाराष्ट्रातील जेजुरी येथे खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे.

मणी आणि मल्ल या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवचा अवतार घेऊन त्याच विनाश केला. ते दोघेही शिवभक्त होते. परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता. त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला होता, अशी आख्यायिका आहे. राक्षसांशी झालेलल्या युध्दात 'खांड' नामक शस्त्राचा वापर कण्यात आल्याने खांडधारी 'खंडोबा'च्या नावाने मार्तंड मल्हारी ओळखले जाऊ लागले.

खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव आहे. कानडी भाषेत त्याला येळू म्हणजे सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते. सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपत्ती नांदावी, अशी मनीषा त्यामुळे आहे. खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. त्यामुळे 'तळी आरती'च्या वेळी 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष केला जातो.

खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा होते. कर्नाटकमध्ये तिला माळजमाळची-माळवी-माळव असे म्हटले जाते. तर खंडोबांला म्हाळसाकांत म्हटले जाते. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई धनगर होती. धनगर समाजाची ती कुळदैवत आहे.

कर्नाटक-आंध्र प्रदेशात काहींची कुलदेवता मैलार-मैराळ म्हणजे खंडोबा व म्हाळसा आहेत. मद्रासमधील मैलापूर येथील ते मुळ रहिवासी आहेत. जेजूरी, निमगाव, पाली पेंबर, नलदुर्ग, शेंगुड सातारा, मालेगाव (नांदेड़) मैलारपूर, मंगसुळी, मैलार, देवरगुड्डू व मण्मैणार आदी ठिकाणी खंडोबाची तीर्थस्थाने आहेत.

खंडोबाची पूजा करताना तळी भंडार्‍याला खूप महत्व आहे. नवीन येणारी बाजरी, वांगे, गुळ, लसुण, कांदे यांचा नैवेद्य यावेळी दाखविला जातो. खोबर्‍याचा प्रसाद देऊन कपाळावर हळदीचा भंडारा लावला जातो. त्यासोबत 'येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषात 'तळी' उचलून खंडोबाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.