शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 जून 2016 (16:30 IST)

गणवेश : चित्रपट परीक्षण

निर्माते - विजयते एन्टरटेन्मेंट
दिग्दर्शक -  अतुल जगदाळे
गायक - नंदेश उमप, उर्मिला धनगर
संगीत - निहार शेंबेकर
कलावंत - किशोर कदम, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे आणि बालकलाकार तन्मय मांडे 
श्रीमंत आणि गरीब हे समाजात असलेले दोन मुख्य घटक. यातील श्रीमंत अधिक श्रीमंत होतो, पण गरीब मात्र अधिकच गरीब होतो. वीट भट्टीवर काम करणार्‍या कामगारांची गतही यापेक्षा वेगळी नाही. या चित्रपटातही एका अशाच वीट भट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाची कथा रेखाटण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यावर आधारीत भाषण करण्यासाठी त्यांच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी शाळेचा 'गणवेश' आवश्यक असतो.  
 
‘गणवेश‘ या शब्दाला एक अभियान, आदर आणि कर्तव्यदक्षता अशा अर्थाचे तीन पदल जोडलेले आहेत. ‘गणवेश‘ आपल्या आयुष्यात वयासोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक अर्थांनी बदलत जातो. ‘विजयते एन्टरटेन्मेंट‘ निर्मित आणि अतुल जगदाळे दिग्दर्शित ‘गणवेश‘ हा सुद्धा असाच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसोबत सगळ्या टप्प्यांवर प्रवास करणारा ठरेल. शाळेतल्या प्रत्येक मुलाने हा चित्रपट पहिलाच पाहिजे कारण यातून त्या मुलाला आयुष्यभरासाठी एक प्रेरणा मिळणार असून गणवेशाचा आदर, अभिमान आणि जबाबदारी याचं भान त्याच्यामध्ये येणार आहे. शिक्षकांनीही मुले आणि पालकांसोबत हा चित्रपट पहावा कारण मुलांना प्रेरित करण्यासाठी तेच सर्वप्रथम त्यांच्या आयुष्यात येणारा घटक आहेत. 
 
 
‘विजयते एन्टरटेन्मेंट‘ या संस्थेने ‘गणवेश‘ची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे निर्मिती दिग्दर्शनात ‘गणवेश‘सोबत पदार्पण करीत आहेत. लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे. ‘गणवेश‘ला आघाडीचे गायक नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे, तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत किशोर कदम, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
रेटिंग : 3.5/5