testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

निळकंठ मास्तर : चित्रपट परीक्षण

marathi movie nilkhant master
Last Updated: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2015 (15:06 IST)
निर्माता: मेघमाला बालाभिम पठारे (अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड) दिग्दर्शक: गजेंद्र अहिरे. कथा आणि पटकथा: गजेंद्र अहिरे.> गीतकार: गजेंद्र अहिरे.> गायक/गायिका: श्रेया घोषाल, जावेद अली, अजय गोगावले, आनंदी जोशी आणि आदित्य मोडक. संगीत: अजय-अतुल.
कलाकार : विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, प्रदिप वेलणकर, अमिता खोपकर, राहुल सोलापूरकर, मंगेश देसाई, पी. डी. कुलकर्णी.


देशप्रेमासाठी आपल्या प्रेमाची आहुती देणा-या स्वातंत्र्यवीरांची कथा 'निळकंठ मास्तर' आपल्यासमोर घेऊन येत आहे. एकिकडे १९४२च्या असहकार चळवळीत भूमिगत स्वातंत्र्यसेनानींची व्यथा तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात एका हळूवार नात्याची चाहूल या सगळ्या पार्श्वभूमीचा आढावा घेणारा हा चित्रपट आहे.देशप्रेमाबरोबरचं देशभक्तांच्या मनात रूजलेली प्रेमभावना या विषयावर भाष्य करणारा अक्षर फिल्म्स प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत चित्रपट ‘निळकंठ मास्तर’… मेघमाला बलभिम पठारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या तरूणाच्या आयुष्यात प्रेमाची लागलेली चाहूल… या सुंदर नात्याची चित्रपटातून उलगडत जाणारी घडी गजेंद्र अहिरेंनी उत्तम बसवली आहे. चित्रपटाचा गाभा ओळखून त्या काळातलं संगीत देण्याचं शिवधनुष्य अजय-अतुल यांनी लिलया पेललं आहे.
देशासाठी झटणा-या तरुणाईचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीरांच्या ब-याच कथा इतिहासात प्रसिद्ध आहेत. या वीरांच्या खांद्याला खांदा मिळवून तितक्याचं सफाईदारपणे स्वातंत्र्याची लढाई लढणा-या वीरांगणांची छवी 'निळकंठ मास्तर' या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर उभी राहणार आहे. नेहा महाजन या सक्षम अभिनेत्रीने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अशाच एका वीरांगणेचे व्यक्तीचित्र पडद्यावर साकारले आहे. स्वातंत्र्याची लढाई लढताना वेळोवेळी करावर लागणारे पलायन, आपली ओळख लपवण्यासाठी केलेले वेशभूषांतर या पार्श्वभूमीवर नेहाचे वेगवेगळे लूक्स 'निळकंठ मास्तर'च्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत.

विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, प्रदिप वेलणकर, अमिता खोपकर, राहुल सोलापूरकर, मंगेश देसाई आणि इतर कलावंतही आहेत. अजय-अतुल यांचं संगीत दिग्दर्शन आणि गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन आहे.

रेटिंग : 3यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...