शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑगस्ट 2015 (14:41 IST)

'षटकार' : चित्रपट परीक्षण

तरूणाईमध्ये वाढत चाललेल्या ‘सायबर क्राईम’ सारख्या विषयावर भाष्य करणारा ‘शॉर्टकट’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आला आहे. मराठीत पहिल्यांदाच अशा तांत्रिक विषयावर सिनेमा करण्यात आला असून अत्यंत महत्वाचा असा हा विषय रोमॅंटिक-थ्रिलर पद्धतीने साकारण्यात आला आहे.

तरूणाई अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या नादात ‘शॉर्टकट’चा मार्ग अवलंबतात. पण हा 'शॉर्टकट' त्यांना पुढे किती महागात पडतो, याचा उलगडा या सिनेमात होणार आहे. अभिनॆता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही हॉट आणि रोमॅंटिक जोडी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार असून, पोलिस ऑफिसरच्या भूमिका अभिनेते राजेश श्रृंगारपुरे यांनी उत्तम प्रकारे साकारली आहे.

या सिनेमात इशिका नावाच्या मॉडर्न मुलीची भूमिका संस्कृतीने साकारली आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडे या सिनेमात बोल्ड अंदाजात नाही तर एक इंटिमेट सीन देताना दिसणार असून, हा इंटिमेट सीन अभिनेता वैभव तत्ववादीसोबत झाल्याने मी ब-याच प्रमाणात कम्फर्टेबल असल्याचे तिने सांगितले. सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांनी केले आहे. सिनेमाची कथा हरीश राऊत यांची असून पटकथा हरीश राऊत, विनय नारायणे आणि राजेश बाळापुरे यांची आहे, तर संवाद विनय नारायणे यांचे आहेत.
या सिनेमासाठी सहा गाणी तयार करण्यात आली असून त्यातील चार गाणी मराठीत तर दोन गाणी हिंदी भाषेत तयार करण्यात आली आहेत. एक- दोन नव्हे तर तब्बल सहा संगीतकारांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली असून एक वेगळाच प्रयोग दिग्दर्शक हरीश राऊत यांनी या सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. संगीतकार निलेश मोहरीर, सुशांत-शंकर, प्रेमानंद, पुनीत दीक्षित, चाँद साध्वानी आणि निक या सहा संगीतकारांनी प्रत्येकी एका गाण्याला संगीत दिले आहे तर सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, कौशिक देशपांडे, मोहोमद इरफान, निक, अभिषेक, अमित मिश्रा, असित त्रिपाठी, गायिका सावनी रविंद्र, आनंदी जोशी आणि राही यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

दिग्दर्शन : हरीश राऊत
कलाकार : राजेश श्रृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुडे, नरेश बिडकर
रेटिंग : 3