गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2015 (12:06 IST)

‘बायोस्कोप’ : सक्षम अभिनयाने सजलेली एक सुरेख अनुभूती

‘बायोस्कोप’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत एक वेगळा प्रयोग झालेला आहे. ‘आंतरिक वेदना’हा समान धागा घेऊन चार आघाडीच्या दिग्दर्शकांनी चार कविता निवडल्यात आणि त्या कवितांना आशयघन कथांमध्ये गुंफून आपल्यासमोर चार वेगवेगळ्या शॉर्टफिल्मसचा एक कोलाज ठेवलाय. ‘बायोस्कोप’मध्ये ‘दिल-ए-नादान’(दिग्दर्शक-गजेंद्र अहिरे), ‘एक होता काऊ’ (दिग्दर्शक- विजू माने), ‘बैल’ (दिग्दर्शक-गिरीश मोहिते) आणि ‘मित्र’ (दिग्दर्शक- रवी जाधव) हे चार अर्ध्या - अर्ध्या तासांचे लघुपट आपल्यासमोर उलगडतात. चित्रपटाच्या सुरूवातीलाच गीतकार आणि शायर गुलजार यांच्या काव्यपंक्तींतून आणि त्या त्यांनी आपल्या खास शैलीत आणि धीरगंभीर आवाजात मांडल्याने एका तरल अनुभूतीवर आपण पोहोचतो. आणि आपल्यासमोर एकामागोमाग एक चार शॉर्टफिल्मस् उलगडत जातात.

मिर्झा गालिब यांची ‘दिल-ए-नादान तुझे हुआँ क्या हैं.’ या गझलवर आधारित लघुकथा आपल्यासमोर उलगडत जाते. शास्त्रीय संगीत गायिकेचं एकटं म्हातारपण, आणि तिला म्हातारपणात मिळालेली तिच्या सारंगीवादकाची साथ या लघुपटामध्ये दर्शविलेली आहे. नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर यांनी या अनामिक नात्याला आपल्या संयत अभिनयाने सुंदररीत्या फुलवलं आहे. गजेंद्र अहिरे यांनी आपल्या या अगोदरच्या सिनेमामधून आपली चित्रपटविषयक तंत्रज्ञाची जाण आणि अभ्यास दर्शविलाच आहे. पण त्यांचा उर्दूमधला व्यासंग यानिमित्ताने समोर आलाय.

‘मिर्झा गालिब’नंतर आपल्यासमोर उलगडतो, सौमित्र यांच्या ‘एखाद्या पावसाळी’ ह्या कवितेवर आधारित दिग्दर्शक विजू मानेंचा ‘एक होता काऊ’ हा लघुपट. शिरीष लाटकर आणि विजू माने यांची पटकथा आणि ह्या लघुपटाचा अतिशय संवेदनशील शेवट आपल्या मनाचा ठाव घेतो. एका काळ्या मुलाची आणि गोर्‍या मुलीची प्रेमकथा आपल्यासमोर उलगडवून दाखवलीय, कुशल बद्रिके आणि स्पृहा जोशी यांनी. ‘फू  बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मुळे कुशल बद्रिकेची चांगली कॉमेडी करणारा अभिनेता अशी ओळख झाली आहे. मात्र ह्या चित्रपटामुळे कुशलमधला उत्तम अभिनेता त्याच्या चाहत्यांच्या समोर येईल.

लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर आहे, गिरीश मोहिते यांचा ‘बैल’ लघुपट. विदर्भातल्या अन्नदात्याची अन्नानदशा चित्रपटात गिरीश मोहितेंनी अत्यंत प्रखरपणे मांडलीय. स्मिता तांबे आणि मंगेश देसाई यांच्या अभिनयाने संपन्न झालेला हा लघुपट आहे. वीणा जामकरच्या अभिनयाचे विशेष कौतुक व्हायला पाहिजे. कारण कुठेही समलैंगिकतेचा उल्लेख न करता ती भावना वीणाने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.