testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनच्या आयडियाची कल्पना

- चंद्रकांत शिंदे

sachin
WD
बाल कलाकार ते यशस्वी निर्माता-दिग्दर्शक, अभिनेता म्हणून नाव कमवणारा सचिन आता प्रेक्षकांसमोर गीतकार संगीतकार म्हणूनही येत आहे. सचिनचा नवा चित्रपट आयडियाची कल्पना ३१ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सचिनने वेबदुनियाशी मारलेल्या खास गप्पांचा सारांश.

आयडियाची कल्पना काय आहे?
आयडियाची कल्पना हा एक अत्यंत मनोरंजक चित्रपट आहे. मी पूर्वीपासूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे आणि यापुढेही करीतच राहणार आहे. मी प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा कट्टर भक्त आहे. ते ज्याप्रमाणे केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट तयार करीत, मीसुद्धा तसाच प्रयत्न करतो.

म्हणजे हा एक कॉमेडी चित्रपट आहे?
कॉमेडी चित्रपट म्हणजेच मनोरंजक चित्रपट नव्हे. एक मनोरंजक चित्रपट असा असतो ज्यामध्ये कॉमेडी, गाणी, नृत्य, रडारड, मारामारी, सस्पेंस, उत्कृष्ट विज्युअल्स असा सर्व मसाला ठासून भरलेला असतो. प्रेक्षक जेव्हा चित्रपट पहायला येतो तेव्हा दोन अडीच तास चित्रपटगृहात त्याने स्वतःला विसरून जाऊन पडद्यावर जे चालले आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. जेव्हा एखादा चित्रपट त्याला हा आनंद प्राप्त करून देतो तेव्हा तो चित्रपट मनोरंजक चित्रपट आहे असे मी म्हणेन.

चित्रपटाचे कथानक काय आहे?
अशोक सराफ यांचा मी मेहुणा आहे. ते वकील असतात. मी सचिन पिळगांवकरसारखा मोठा कलाकार बनण्याचे स्वप्न पहात असतो. अशोक सराफ एक खेळ खेळतात परंतु तो त्यांच्या अंगलत येतो कारण ज्याच्याशी तो हा खेळ खेळतात तो असतो पोलिस कमिशनर महेश कोठारे.

अशोक सराफ यांना आपली चूक कळते परंतु ते या खेळापासून आता दूर होऊ शकत नाहीत. आणि यानंतर मग आम्हा तिघांमध्ये जे काही होते ते म्हणजे हा चित्रपट.

आयडिया म्हणजेच कल्पना नव्हे का?
बरोबर आहे. परंतु समाजात अशी अनेक माणसे आहेत जी एकाच शब्दाचे दोन पर्याय बोलतात. उदाहरणार्थ आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो किंवा मला भयंकर हेडेचची डोकेदुखी आहे. चित्रपटात अशोक सराफ अशा व्यक्तीचीच भूमिका साकारीत आहे. ते दोन-दोन शब्द बोलतात म्हणूनच आम्ही चित्रपटाचे नाव आयडियाची कल्पना ठेवले. दूसरी गोष्ट अशी की चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांना चित्रपटाची नस कळते. मी उगाचच काहीतरी नाव ठेऊन वेगळे काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करीत नाही. माझ्या चित्रपटाची नावे चित्रपटाच्या कथानकाला सूट होतील अशीच असतात.

महेश, तू आणि अशोक सराफ प्रथमच एकत्र येत आहात. आधीपासूनच योजना बनवली होती का?
नाही. जेव्हा मी आयडियाची कल्पनाच्या स्क्रिप्ट वर काम करीत होतो तेव्हा मी आणि मामा (अशोक सराफ) आमच्या दोघांच्या भूमिका नक्की होत्या. स्क्रिप्टमध्ये पोलीस कमिशनरची भूमिका होती. अगोदर ती छोटी होती परंतु कथानकाची गरज असल्याने ती भूमिका मला अत्यंत सशक्त करावी लागली. जेव्हा भूमिका लिहून पूर्ण झाली तेव्हा त्या भूमिकेत माझ्या डोळ्यासमोर महेश कोठारेचाच चेहरा आला. मी जेव्हा त्याला या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तोही लगेच तयार झाला. आणि अशा तर्‍हेने आम्ही तिघे प्रथमच एकत्र प्रेक्षकांसमोर येत आहोत.

या चित्रपटाद्वारा तू प्रथमच संगीतकार म्हणूनही प्रेक्षकांसमोर येत आहेस.
हो. खरे तर हे माझ्या डोक्यातच नव्हते. माझ्या प्रत्येक चित्रपटात मी कोणाला ना कोणाला तरी इंट्रोड्‌यूस करीत असतो. हा चित्रपट पूर्ण झाला परंतु यात कोणालाही इंट्रोड्‌यूस केले गेले नव्हते. आम्ही या गोष्टीवर विचार करीत असतानाच यूनिटच्या एका सदस्याने म्हटले की आपण यात तुम्हाला (म्हणजे मला) संगीतकार म्हणून इंट्रोड्‌यूस करीत आहोत. तेव्हा माझ्या डोक्यात ट्‌यूब पेटली की, अरे हो खरंच की आपण या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहोत.

अवधूत असताना संगीत द्यावेसे का वाटले?
चित्रपटाची तयारी करीत असतानाच दोन गाण्यांना मी संगीत दिले. कारण मला संगीताची बर्‍यापैकी जाण आहे. यापैकी एक गाणे लागा मोटरिया का द्रक्का आणि दूसरे चित्रपटाचे शीर्षक गीत आहे.

चित्रपटातील तुझे आवडते गाणे कोणते?
तुला वाटेल की मी माझ्या गाण्याचे नाव घेईन परंतु तसे नाही. अवच्च्ूतने चित्रपटासाठी जी लावणी केली आहे ती कमालीची आहे. आम्ही नाही जा शब्द असलेल्या या लावणीत जा शब्द असा काही उच्चारला आहे की प्रेक्षक या जा वर उड्‌या टाकतील यात शंका नाही.

चित्रपटाची सुरुवात तू लक्ष्‌मीकांत बेर्डेच्या नावाने केली आहेस.
हो अगदी खरे आहे. याचे कारण एवढेच की लक्ष्‌या माझ्या प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होता. तो नसल्यामुळे मला माझा एक हात नसल्यासारखे वाटत आले आहे. या चित्रपटात मी कलाकार बनण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणाची भूमिका साकारीत आहे. एका टॅलंट स्पर्धेत मी भाग घेतो. ही टॅलेंट स्पर्धा लक्ष्‌मीकांत बेर्डेच्या नावाने आयोजित केलेली आहे. चित्रपटाची सुरुवात मुद्दामच मी लक्ष्‌मीकांतच्या नावाने केली कारण एका मित्राला मी ती दिलेली श्रद्धांजली आहे.

आयडियाची कल्पनानंतर काय?
वेबदुनिया|
सचिन, महेश आणि अशोक सराफ प्रथमच एकत्र

राजश्री प्रोडक्शनसाठी अखियो के झरोखे से चा भाग दोन जाना पहचाना नावाने बनवत आहे. याची कथा, दिग्दर्शन माझेच असून मी आणि रंजीता ३२ वर्षानंतर पुन्हा या चित्रपटाद्वारे एकत्र येत आहोत. खरे तर सूरज बड़जात्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करावा असे सगळ्यांना वाटत होते परंतु सूरज बड़जात्याने प्रथमच सांगितले होते की हा चित्रपट सचिनच दिग्दर्शित करेल. कारण त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता. चित्रपट ४० टक्के तयार झाला आहे. पुढील वर्षी ६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.


यावर अधिक वाचा :

कतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर

national news
‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ...

हाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच

national news
प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी ऊप्स मोमेंट अर्थात एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामना करावा ...

‘कॉफी विद करण’ पहिले गेस्ट दीपिका व रणवीर

national news
दीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार ...

कोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय???

national news
आजीच्या गोळयांची वेळ आता 'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन् 'आजही यांना माझ्या सगळ्या ...

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...