शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

उडणार्‍या सापाचे जीवाश्म सापडले

शास्त्रज्ञांनी उडणार्‍या सापाच्या एका नव्या प्रजातीची ओळख पटविली आहे. सुमारे 50 लाख पृथ्वीवर आढळून येणार्‍या या सापांचे पंख आकाराला बरेच मोठे होते. हे साप खासकरून नदीकाठच्या झाडाझुडपांमध्ये राहत असत आणि छोटे मासे वा किडे खात. या प्रजातीच्या सापांचा आकार एका बोटापेक्षा जास्त मोठा नव्हता.
या नव्या प्रजातीच्या सापाला शास्त्रज्ञांनी जिलेंटोफिस स्कूबेर्टी असे नाव दिले आहे. अमेरिकेच्या टेनेसी प्रांतातील ग्रे शहरानजीक या सापाचे जीवाश्म आढळून आले आहे. जीवाश्माच्या सखोल अध्ययनानंतर या सापाची ओळख प‍टविण्यात आली. या जीवाश्मामध्ये वर्टिब्रचे मिळणे सर्वात आश्चर्यचकित करणारा शोध आहे. या वर्टिब्रचा सापांच्या ज्ञान प्रजातींसोबत कोणताही ताळमेल नाही.
 
पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ स्टीवेन जॅसिंस्की यांनी सांगितले की सापांना हात व पाय नसतात, मात्र त्यांच्यामध्ये मोठ्या संख्येने वर्टिब्र असतात. वर्टिब्र एक प्रकाराची हाडे असून त्यांच्या मदतीने पुरातत्त्वशास्त्रज्ञ सापांच्या जीवाश्माची ओळख करतात.