शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी हे करा

सर्वांना हुशार म्हणून ओळखलं जाणं आवडतं. अधिक समजदार, बुद्धिमान, स्मार्ट, फास्ट विचार करणारे लोकं सर्वांचे प्रिय असतं. सर्व असे नसले तरी काही उपायाने मस्तिष्काची ताकद वाढवता येऊ शकते. वाचा यासाठी काही सोपे उपाय: 

* स्वत:ला एखाद्या खेळात गुंतवावे. 
 
* एखादी नवीन भाषा शिकावी. असे केल्याने आपल्या मेंदूतील पेशी उत्तेजित होतात आणि आपलं मेंदू तल्लख होतं.

* एरोबिक व्यायाम केल्याने मेंदू चपळ राहतं.
 
* वॉकिंग सर्वोत्तम उपाय आहे कारण याने शरीरात ऑक्सिजनची खपत वाढते आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळाल्याने चांगले परिणाम दिसू येतात. मॉर्निंग वॉक सर्वोत्तम आहे कारण सकाळच्या वेळेस मेंदू अधिक तीव्रतेने काम करतं.
 
* पूर्ण आठ तास झोप घेतल्याने मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू ताजातवाना होतं. याने मेंदूची ताकदही वाढते.
कारण आराम करताना मस्तिष्कामध्ये डेमेज झालेले उती आणि पेशींना शरीराला सुधारण्याची पर्याप्त वेळ मिळतो. याने मानसिक प्रदर्शनात सुधार येतो.

* आहारात कर्बोदक, प्रोटीन, फायबर आणि फॅट्स आढळणारे पदार्थ सामील करावे. आहार घेणे टाळू नये. मेंदूला प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी निरंतर ऊर्जेची गरज असते.
 
* डायटिंग करणारे किंवा वेळेवारी पर्याप्त आहार न घेणार्‍यांना स्मृतिभ्रंश, व्याकुलता आणि संभ्रम सारख्या समस्यांचा सामोरा जावं लागतं. म्हणून मेंदू तल्लख ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पोषक आहार घ्यावे.
 
* आपल्या आहारात फिश सामील करा. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतं जे मेंदूला काम करण्यात मदत करतं. ताण सहन करत असलेल्या मेंदूला याची अधिक आवश्यकता असते.
* मेंदू तल्लख करण्यासाठी विभिन्न पझल्स, सुडोकू आणि ब्रेन टीजर्स सोडवण्याचे प्रयत्न करायला हवे.
रोज काही नवीन शिकण्यावर जोर द्यावं.
 
* आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेडिटेशन करावं आणि नेहमी सकारात्मक विचार करावा.