गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

खाण्याचा आनंद घ्या

मित्रांनो, आरोग्य धनसंपदा असं वचन आहे. उत्तम आरोग्यासाठी अन्नात समतोल कसा राखायचा हे जाणून घेऊ या...
 
अन्नाला नावं ठेऊ नका, मित्र व घरच्यांबरोबर अन्न वाटून खाल्ल्यास तुम्हाला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखता येतील.
 
शाळेत जायची घाई आहे म्हणून सकाळचा नाश्ता टाळू नका. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे नाश्त्याचा कंटाळा करू नका.
आपल्या शरीराला जवळपास 40 पोषकतत्वं आणि जीवनसत्त्वांची गरज असते. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खा. फळं, भाज्या, सॅलड यांचा समावेश करा.
 
शरीराची ऊर्जेची अर्धी गरज कार्बोहायड्रेट्समुळे भागते. त्यामुळे पोळी, भात, कडधान्यं यांचा आहारात समावेश करा.
 
फळं, भाज्यांमधून सर्वाधिक पोषक तत्त्वं मिळतात म्हणून फळं भाज्या खाण्याचा कंटाळा करू नका.
 
दररोज व्यायाम करा. मैदानात खेळा. यामुळे तुमचा उत्साह टिकून राहील.