गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

फॉर लेमन चार्जिंग

व्हॉट्स अॅपवरील काही भन्नाट व्हिडिओ आपलं मनोरंजन तर करतात पण ते खरे आहेत की खोटे असा प्रश्नही पडतो. गंमत म्हणून आपण हे व्हिडिओ बघतो. मित्रांनो, फोन चार्ज करायचा असेल तर तुम्ही काय कराल? सॉकेटमध्ये चार्जर लावाल किंवा पॉवर बॅकचा वापर कराल. हो अगदी खरंय. पण लाईट गेलेत, फोन चार्ज करायचा आहे, पॉवर बँकची बॅटरीही लो आहे अशा वेळी तुम्ही चक्क लिंबाचा वापर करून फोन चार्ज करू शकता. आश्चर्य वाटतयं ना. पण मित्रांनो, हे खरं आहे.
अशा प्रकारचा एक व्हिडिओ मध्यंतरी वायरल झाला होता. तुम्हीही तो पाहिला असेल. तुमच्या घरात लिंबू असेल तर अगदी सहज तुम्ही फोन चार्ज करू शकता. यू ट्यूबवर सर्च केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला दिसू शकेल. लिंबानं फोन चार्ज करायचा असेल तर आधी लिंबू अर्ध कापा. आता तुमच्या चार्जरचे दोन्ही भाग लिंबांच्या दोन फोडींमध्ये घाला. आता चार्जरची वायरने तुमचा फोन चार्ज होऊ लागेल. लिंबानं तुम्ही फोन अगदी सहज चार्ज करू शकता. त्यामुळे आता लाइट गेल्यावरही बॅटरी लो झालीये म्हणून काळजी करत बसायचं काहीच कारण नाही.
 
तुमच्याकडे लिंबू आहे ना! दोस्तांनो, हा प्रयोग मोठ्यांच्या देखरेखीखालीच करा. अशा प्रकाराचा व्हिडिओ वायरल झाला असला तरी याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तुमचा स्मार्टफोन खराब होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.