गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

रोचक माहिती: अश्या तयार केल्या जातात आगपेटीच्या काड्या

आगपेटीच्या काड्या मेण लागलेल्या कागद किंवा दफ्तीने तयार केल्या जातात. याच्या एका टोकाला ज्वलनशील पदार्थांचे मिश्रण लावलं जातं.
 
याचे निर्माण जॉन वॉल्करने 1827 साली केले होते. लाकडाच्या तुकड्यावर सरस, स्टार्च, एंटीमनी सल्फाईड, पोटॅशियम क्लोरेट लावून तयार केले गेले होते. परंतू ही सुरक्षित नव्हती. सुरक्षित काड्या 1844 मध्ये स्वीडनच्या ई. पोश्च यांच्याद्वारे तयार करण्यात आल्या होत्या.
आज आगपेटीच्या काड्या दोन प्रकाराच्या असतात. पहिल्या प्रकारच्या माचिसला घर्षण माचीस म्हणतात. याला एखाद्या खडबडीत पृष्ठभागेवर रगडून आग पैदा केली जाऊ शकते. यात सर्वात आधी लाकड्याच्या काडीच्या एक चतुर्थांश भागाला विरघळलेल्या मेण किंवा गंधकमध्ये बुडवलं जातं. नंतर त्यावर फॉस्फोरस ट्रायसल्फाईडचे मिश्रण लावलं जातं. त्यावर एंटीमनी सल्फाईड आणि पोटॅशियम क्लोरेट मिश्रण लावलं जातं. घर्षणासाठी मिश्रणात काचेचा चुरा किंवा वाळू मिसळी जाते. पांढरा भाग रगडेपर्यंत किंवा आग पकडेपर्यंत निळा भाग जळत नाही. या पदार्थाद्वारे काडीच्या दुसर्‍या भागात आग पोहचते. या काड्यांमध्ये लवकर आग पेटते.
 
सुरक्षित काड्या दुसर्‍या प्रकाराच्या काड्या आहेत. या आगपेटीवरील रसायनावर घासूनच पेटतात. या कड्यांचा निर्माण वरील दिलेल्या प्रक्रियेप्रमाणेच होतो केवळ यात फॉस्फोरस ट्रायसल्फाईड वापरले जात नाही. याऐवजी लाल फॉस्फोरस लावलं जातं. याची विशेषता ही आहे की रसायनावर घासल्याशिवाय आग पेटत नाही. आमच्या घरांमध्ये याच आगपेटीचा वापर केला जातो.
 
साभार- देवपुत्र