शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

दोन डोळे का? वाचा रोचक माहिती...

अरविंद कुमार जोशी
आम्ही दोन डोळ्याने जे रंग-रूप, वस्तू, जीव आणि झाडं बघू शकतो, ते एका डोळ्यानेदेखील बघू शकतो. मग निसर्गाने आम्हाला दोन डोळे का दिले असावे? याचे एक उत्तर हेही आहे की अधिकशे आवश्यक अंग जसे कान, मूत्राशय, फुफ्फुसे, हात आणि पाय हेही तर 2-2 असल्यामागील कारण आहे की एक काम करत नसल्यास दुसर्‍याकडून काम घेता येईल परंतू डोळ्याच्या बाबतीत हे उत्तर पुरेसे नाही.
दोन्ही डोळ्याने दिसणारं अगदी तसचं नसतं जसं एका डोळ्याने दिसतं. अंतर जाणून घेण्यासाठी आम्ही एक प्रयोग करू या. आपल्या दोन्ही हातात 1-1 पेन्सिल घ्या. एका हातात पेन्सिल उलटी पकडून घ्या. दोन्ही हात दूर पसरवून घ्या. आता हात जवळ घेऊन या ज्याने पेन्सिलचे टोक अमोर-समोर (एका दुसर्‍यावर) असावे, पण एका दुसर्‍याला स्पर्श करत नसावे.
 
पुन्हा हात दूर न्या. एक डोळा बंद करून पहिल्याप्रमाणेच दोन्ही हात जवळ घेऊन या. जेव्हा वाटेल की दोन्ही टोक एकमेकावर आले आहेत तेव्हा थांबा. आता डोळा उघडा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका डोळ्याने बघितल्यावर जे टोक एकमेकाच्या वर दिसत होते ते दोन्ही डोळे उघडल्यावर एकमेकाच्या अगदी समान नाहीत, त्याच्यात दुरी आहे.
 
दोन्ही डोळ्याने बघितल्यावरच त्यातील खरोखर असलेली दुरी दिसून येते हे सिद्ध होतं. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर एक डोळा लांबी- रुंदीची माहिती पुरवतो, जेव्हाकी खोल किती आहे ही माहिती दुसर्‍या डोळ्याने कळते.
 
म्हणूनच थ्री डी चित्रपटांची शूटिंग एक नव्हे तर दोन कॅमेर्‍याने केली जाते. थ्री डी चित्रपट दाखवतानाही 2-2 प्रोजेक्टर्स वापरले जातात. एक विशेष चष्मा वापरल्यावर यात उजवा डोळ्याला केवळ डाव्या कॅमेर्‍याने कॅप्चर केलेले दृश्य दिसतात. या प्रकारे डोळ्यांना खोलपण्याचा आभास होतो.

-देवपुत्र