शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

आश्चर्यकारक तथ्ये

मनुष्याच्या शरीरात एवढे पाणी आहे ज्याने 2 महिन्याच्या बाळाला अंघोळ घातली जाऊ शकते.
 
मनुष्याच्या शरीरात इतके फॉस्फरस आहे ज्याने 20 आगपेट्या तयार केल्या जाऊ शकतात.

मनुष्याच्या शरीरात इतकी साखर असते की 20 कप गोड चहा बनू शकतो.
 
मनुष्याच्या शरीरात 60 टक्के वजन पाण्याचं असतं.


मनुष्याच्या शरीरात इतका चुना असतो ज्याने 2 ते 3 हात लांब भिंत पेंट केली जाऊ शकते.
 
वयस्क मनुष्याच्या शरीरात 7 साबणाच्या वड्या तयार करण्याएवढी चरबी असते.

सामान्यपणे प्रत्येक मनुष्याच्या शरीरात 5 लीटर रक्त असतं.
 
मनुष्याच्या मेंदूत 100 अब्ज सूचना साठवण्याची क्षमता असते.

मनुष्याच्या शरीरात ‍इतकं कॉपर आहे ज्याने एक नाणं तयार केलं जाऊ शकतो.
 
मनुष्याच्या जन्माच्यावेळी 300 हाडं असतात, मात्र मोठेपणी हाडांची संख्या 206 एवढीच असते.

मनुष्याच्या शरीरातून सरासरी 700 मिलीलीटर पाणी घामाच्यारूपात बाहेर पडतं.
 
मनुष्याच्या शरीरात इतकं कार्बन असतं की 100 पेन्सिली तयार केल्या जाऊ शकतात.