गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

जाणून घ्या भारतातील राज्यांचे पक्षी

आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, कर्नाटक
भारतीय रोलर- निळ्या रंगाचे पंख आणि शेपूट असल्यामुळे यांना लोकल भाषेत नीलकंठ असेही म्हणतात. असे मानले जातात की हा पक्षी दिसल्यास भाग्य उजळतं.


अरुणाचल प्रदेश, केरळ:
ग्रेट हॉर्नबिल- या पक्ष्याच्या पूर्ण अंगावर ग्रे रंगाचे पंख असतात. यांच्या डोक्याचा उभार काळा रंगाचा आणि चोच लांब असते.

आसाम:
व्हाईट विंग वुड डक- हे बदकांमध्ये सर्वात मोठे असतात. यांची लांबी 30 ते 35 इंच पर्यंत असते. ही प्रजाती केवळ रात्रीच्या वेळेस आहार घेते, ज्यात बिया, धान्य, तांदूळ, वनस्पती, कीट आणि लहान मासोळ्या सामील आहे. 

बिहार: 
चिमणी- ही चिमणी घरातील अंगणात सहजपणे दिसून येते.

मेघालय, छत्तीसगड:
पहाडी मैना-
याला सारिका म्हणूनही ओळखलं जातं. या पक्ष्यात मानवी बोलीची नक्कल करण्याची क्षमता असते.

गोवा:
ब्लॅक क्रेस्टेड बुलबुल-
ही चिमणीची प्रजाती आहे. यांच्या डोक्यावर एक काळा तुरा असतो आणि शरीराचा भाग पिवळा असतो. हे पक्षी कीट आणि फळं खातात.

गुजरात:
ग्रेट फ्लेमिंगो-
ही फ्लेमिंगो पक्ष्याची सर्वात मोठी प्रजाती आहे. हे पांढरे किंवा ग्रे रंगाचे असतात. यांचे पंख पांढरे किंवा गुलाबी रंगाचे असतात. हे आफ्रिका, मीडिल ईस्ट येथे दिसून येतात.

हरयाणा:
ब्लॅक फ्रँकोलिन
( काळं तितर)- हे झाड्या झुडुपांत राहणे पसंत करतात. हे अश्या शेतात राहणे पसंत करतात जेथील पीक उंच असेल ज्यात हे लपू शकतात.

हिमाचल प्रदेश: 
वेस्टर्न ट्रागोपन- हे एक हिमालयी तितर आहे.

जम्मू- काश्मीर:
श्याम-कण्ठी करकोचा-
काळ्या मानेचा क्रेन एक मध्यम आकाराच क्रेन आहे. हे पक्षी नर असो वा मादा एक सारखे दिसतात.

झारखंड, पाँडिचेरी:
आशियाई कोकिळा-
ही कावळ्याच्या घरट्यात अंडी देते. हिची आवाज मधुर असते.

मध्य प्रदेश:
आशियाई पॅराडाइस फ्लायकॅचर-
हे आशियातील मूळ निवासी पक्षी आहे. याची लांब शेपूट रिबनसारखी असते, जी चालताना झुलते.

महाराष्ट्र:
हरियाल-
याला येलो फुट ग्रीन पिजन म्हणूनही ओळखलं जातं. रंगाची एक वेगळीच बानगी या पक्ष्यावर दिसून येते.

मणीपूर, मिझोराम:
मिसिस हूमेस तितर-
या पक्ष्याचं शोध भारताने लावला होता. तसेच हा पक्षी चीन, थायलंड आणि बर्मा येथील दिसून येतो.

नागालँड:
ब्लाइथ्स ट्रागोपन-
जंगलाच्या कटावामुळे याची संख्या पडत आहे. हे अधिकश्या बिया आणि फळं खातात.

पंजाब:
उत्तरी बाज-
हा एक मध्यम आकाराचा रॅप्टर आहे. हा लपून शिकार करतो. याचा घरट्याजवळ जाणार्‍यांवर हा पक्षी हल्ला करतो.

राजस्थान:
द ग्रेट इंडियन बस्टर्ड-
विशाल भारतीय तिलोर पक्षी केवळ भारतीय उपखंडात दिसतात. हे दुनियेतील सर्वात वजनदार पक्षी आहे जे उडू शकतात. याची संख्या दिवसोदिवस कमी होत आहे.

सिक्कीम:
चिल्मिया-
तितर कुटुंबातील या रक्त तितर या पक्ष्याची शेपूट लांब असते. याचं शरीर लाल रंगाचं असतं म्हणून याला रेड फीसेंट म्हणून ही ओळखलं जातं.

तामिळनाडू:
एमेरल्ड पिजन- याचे
पंख चमकदार हिरव्या रंगाचे असतात.

उत्तराखंड:
हिमालयी मोनाल-
हा तितर कुटुंबाचा पक्षी आहे. हा पक्षी नेपाळाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

उत्तरप्रदेश:
करकोचा-
या दुनियेतील सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. हा 5 फीट 11 इंच लांब असतो. 

वेस्ट बंगाल:
व्हाईट ब्रस्टेड किंगफिशर-
पांढर्‍या छातीचे किंगफिशर बंगाल येथे दिसून येतात. हे लहान सरीसृप, केकडे, कीट आणि पक्ष्यांना खातात.

त्रिपुरा:
ग्रीन इंपीरिअल कबूतर-
हे थोडे लठ्ठ, मोठे आणि 45 सेंटिमीटर लांब कबूतर असतात. यांचे मागील पंख आणि शेपूट हिरव्या रंगाची असते.