शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 9 डिसेंबर 2014 (14:00 IST)

माकडे थंडीपासून बचाव करणसाठी गरम पाण्यात बसतात

उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा आहे. या ऋतूमुळे शीतकटिबंधातील बहुतेक देशांत प्रचंड हिमवर्षावाबरोबरच कडाक्याची थंडीही पडत आहे. यास जपानही काही अपवाद नाही. जपानमध्ये असा एक प्रदेश आहे की, तेथे थंडीपासून जीव वाचवण्यासाठी माकडांना गरम पाण्याच्या  कुंड्यात बसावे लागते.
 
जपानमध्ये बहुतेक ठिकाणी प्रचंड हिमवर्षाव होत असतो. नागानो प्रिफॅक्चा शहरानजीक असलेल्या खोर्‍र्‍यात दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रचंड हिमवर्षाव होतो. 
 
सुमारे 850 मीटर क्षेत्रात पसरलेल्या या भागात मोठय़ा प्रमाणात बर्फ पडत असल्याने हिवाळ्यात हे खोरे मृत्यूचे खोरे बनते. विशेष म्हणजे याच परिसरात ‘जिगोकदानी मंकी पार्क’ आहे. या पार्कमध्ये मोठय़ा संख्येने माकडे आढळून येतात. याशिवाय या भागाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे गरम पाण्याचे एक कुंडही आहे. कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करून घेण्यासाठी ही माकडे या कुंडात बसून असतात.