शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

या 4 गोष्टी गुपित ठेवाव्या

आचार्य चाणक्य तत्त्वज्ञान मध्ये पारंगत होते. ते महान शिक्षक होते. त्यांनी आपल्या अनुभवाने जे नियम तयार केले, त्या उपदेशांमुळे ते अमर होऊन गेले. जाणून घ्या चाणक्य यांच्याप्रमाणे अश्या गोष्टी ज्या गुपित ठेवायला हव्या.
1. दुःख: मन दुखी असलं तरी हे कोणासमोर व्यक्त करू नये, कारण जगात खरे हितैषी खूप कमी असतात. बहुतेक समोरच्या आपल्या दुःखांवर आनंदी होईल. अशाने आपण अजून दुखी व्हाल. म्हणून शक्योतर आपले दुःख सार्वजनिक करू नये.

2. धनाची हानी: आपल्या धनाची हानी झाली असली तरी ही गोष्ट कोणाला सांगू नये. याने आपली प्रतिष्ठा नष्ट होते. लोकं सन्मान देत नाही. मदतीची हात देणे तर सोडाच लोकं याला थट्टेचा विषय करतात.

3. अपमान: आपला अपमान झाला असला तर त्याची चर्चा नको. आपण अपमानित झालो हे सांगून आपण मनावरच ओझं कमी करू पाहत असाल पण समोरच्याने ही गोष्ट दुसरीकडे सांगितली तर अपमानात वृद्धी होते. म्हणून अश्या गोष्टी गुपित ठेवलेल्याच योग्य.

4. कौटुंबिक समस्या: आपल्या कुटुंबात होणारे वाद,  समस्या इतरांसमोर मांडू नये. विशेषकर पुरुषांनी आपल्या पत्नीच्या चरित्राबद्दल दुसर्‍यांसमोर टिका करू नये. असं केल्याने प्रतिष्ठा, सन्मान नष्ट होतं. यामुळे भविष्यात अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.