गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

राष्ट्रगीताबद्दल जाणून घ्या सामान्य माहिती

* राष्ट्रगीत हे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिले होते.
 
* राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे आहे. देशभरांत म्हटले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.
 
* ‘जन-गण-मन’ या गाण्याच्या हिंदी रूपांतरणाचे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
 
* राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
 
* राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करूनच हे गीत म्हणावे.
 
* 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
 
* राष्ट्रगीत पहिल्यांदा जानेवारी 1992 मध्ये ‘भारत विधाता’ या शीर्षकाखाली ‘तत्त्व बोधिनी’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
 
* 1919 मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रूपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.