गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2015 (15:57 IST)

त्वचा संबंधी आजार दूर करण्यासाठी ज्योतिषाचे हे उपाय करा!

pimpal jyotish
साधारणपणे रक्त संबंधी दोष असल्याने चेहर्‍यावर पिंपल्स होतात, तसेच खाण्यात पिण्यात गडबडी झाल्यामुळे देखील पिंपल्स होण्याची शक्यता असते. कधी कधी पत्रिकेत ग्रह दोष असल्यामुळेपण या समस्यांना तोंड द्यावे लागतात. ज्योतिषीनुसार बुध, शनी, राहू आणि मंगळ अशुभ असले आणि सूर्य, चंद्राचे निर्बळ असले तर त्वचेशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. पत्रिकेत षष्ठम भाव त्वचेशी संबंधित असतो. जर पत्रिकेत सातव्या स्थानावर केतू असेल तरी त्वचारोग होण्याची शक्यता असते. बुध जर सबळ बलवान असेल तर हा रोग आपला पूर्ण असर दाखवू शकत नाही. त्या उलट जर बुध निर्बळ असेल तर तो व्यक्ती निश्चितच त्वचेच्या आजाराने त्रस्त असतो.  
 
- चंद्रामुळे पाणी किंवा पस असलेले पिंपल्स येतात.  
- मंगळामुळे रक्त विकार असलेले पिंपल्स होण्याची शक्यता असते.  
- राहूच्या प्रभावामुळे वेदनादायक पिंपल्स होतात. 
 
त्वचा संबंधी आजारांना दूर करण्यासाठी ज्योतिषी उपाय
1. जर षष्ठम स्थानात एखादा अशुभ ग्रह असेल तर त्याचा उपाय करायला पाहिजे.  
2. सूर्य मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले पाहिजे.  
3. शनिवारी कुत्र्याला तेल लावलेली पोळी घाला. याने शनी आणि राहू-केतू संबंधी दोष दूर होण्यास मदत मिळेल.  
4. सरस्वती स्तोत्राचा पाठ करायला पाहिजे.  
5. पारद शिवलिंगाचे पूजन केले पाहिजे.  
6. दररोज सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे आणि सूर्याच्या मंत्रासोबत 7 परिक्रमा कराव्या.