testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ज्योतिषशास्त्र (Astrology) : पारंपरिक भविष्यवाणी

panchang
Last Updated: सोमवार, 18 एप्रिल 2016 (12:44 IST)
जातक. यालाच होराशास्त्र म्हणतात. यात वैयक्तिक फलांचा विचार आहे.

तिथी व मुहूर्त:
मद्य जसे विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी मुरविण्याठी ठेवलेले असते, त्यात ते गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे एका विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी माणूस जन्माला येतो. त्यात ते गुणधर्म असतात. ज्योतिषशास्त्र याहून जास्त कसलीही हमी देत नाही.-- कार्ल गुस्ताव युंग.

माणसाच्या जन्मकाळी ग्रहनक्षत्रांची स्थिती पाहून त्यावरुन त्याच्या पुढील आयुष्यात घडणार्‍या घटनांचे वर्तविणे म्हणजे जातक.
पंचांग
दिवस, महिना, वर्ष यांचा नक्की कालावधी ठरविणे, कोणत्या दिवशी कोणते ग्रह, नक्षत्र आकाशात कोठे असतील हे सांगण्यासाठी गणित विभाग सिद्धांत मांडतो. सिद्धांतानुसार दर दिवशी त्या वर्षात येणार्‍या स्पष्ट स्थितीची नोंद दाखविणारे पुस्तक म्हणजे पंचांग.
तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे होत.

तिथी
चंद्राची गती सूर्याहून जास्त असते त्यामुळे चंद्र पुढे जातो. त्या दोघांमध्ये 12 अंश अंतर पडण्यास जो काळ लागतो, त्यास तिथी म्हणतात. एका चांद्रमासात 30 तिथी होतात.

करण
मग चंद्रसूर्य पुन्हा एकत्र येतात. अर्धीतिथी म्हणजे करण. (6 अंश अंतर).

वार
सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत एक वार.


नक्षत्र
संपूर्ण नभाचे, 800 कलांचा एक असे 27 भाग केले, त्या प्रत्येक भागास, आणि तो क्रमिण्यास चंद्रास लागणारा काळ त्यास नक्षत्र म्हणतात.

योग
चंद्रसूर्यांच्या भोगांची(क्रमिलेल्या अंतरांची) बेरीज करून त्यावरून 800 कला बेरीज होण्यास लागणारा काल म्हणजे योग होय.


यावर अधिक वाचा :