शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

कोणत्या वारी झाला जन्म? जाणून घ्या आपला स्वभाव

ग्रंथाप्रमाणे अनेक प्रकाराच्या ज्योतिष विद्या असल्याचे कळून येतं. कोणी राशीनुसार तर कोणी कुंडलीच्या लग्नानुसार स्वभाव सांगतात. येथे प्रस्तुत आहे वाराप्रमाणे आपल्या स्वभावाबद्दल जाणून घेण्याची संधी. आपण ज्या वारी जन्माला आला असाल त्यानुसार आपला स्वभाव असतो: 


रविवार: रविवारी जन्माला आलेल्या व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव असतो. असे जातक स्वभावाने निर्भय किंतू उदार असतात. रंग गव्हाळ आणि कपाळ रुंद असतं. असे व्यक्ती पराक्रमी असतात.


सोमवार: सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तीच्या स्वभावावर चंद्राचा प्रभाव असतो. असे व्यक्ती स्वभावाने शांत आणि आध्यात्मिक विचाराने समृद्ध असतात. यांच्या वाणीत गोडवा असतो. तसेच गंभीर आणि भावुक असतात.

मंगळवार: मंगळवारी जन्माला आलेल्या व्यक्तीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. अश्या व्यक्तीचा मंगळ खराब असल्या तो तापट असून सदैव राग, हट्टी स्वभावाचा राहील. मंगळ चांगला असल्यास तो व्यक्ती निर्भय,‍ निडर आणि न्यायप्रिय राहील आणि प्रत्येक परिस्थितीत बुद्धीने काम करेल.

बुधवार: बुधवारी जन्माला आलेल्या व्यक्तीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. असे व्यक्ती कला आणि व्यवसायात निपुण असतात. यांच्या वाणीत गोडवा असतो आणि चेहरा आकर्षक. परंतु कुंडलिनीमध्ये बुधाची स्थिती खराब असल्यास असे व्यक्ती हुशार आणि दिव्यास्वप्न पाहणारे असतात. तसे हे नेहमी दुविधेत आणि शंकेत जगणारे असतात.
गुरुवार: गुरुवारी जन्माला आलेले व्यक्ती बृहस्पति ग्रहाने प्रभावित असतात. असे व्यक्ती गंभीर चिंतन करणारे आणि धार्मिक स्वभावाने संपन्न असतात. स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे हित विचार करणारे असतात. पण गुरुची स्थिती योग्य नसल्यास असे व्यक्ती ढोंगी बनू शकतात. हे खोटे बोलणारे आणि लोकांना चुकीचे ज्ञान देऊन भ्रमात टाकणारे असतात.
शुक्रवार: शुक्रवारी जन्माला आलेल्या व्यक्तीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. ग्रह योग्य असल्यास व्यक्ती कलाप्रिय आणि बुद्धिमान असेल. आधुनिक विचारसारणीला महत्त्व देणारा आणि स्वभावाने विनम्र असेल. लोकांना आपल्या बोली आणि कर्तृत्वाने प्रभावित करण्यात कुशल असेल. ग्रह खराब असल्यास सर्व सुविधांनी युक्त जीवन जगणारा आणि आरामपसंत व्यक्ती असेल. शनिवार: शनिवारी जन्म घेतलेल्या व्यक्तीवर शनी ग्रहाचा प्रभाव मानला गेला आहे तर जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्ती न्यायप्रिय, कलाप्रिय आणि कर्म करणारा असेल. तो स्पष्टवादी आणि सिद्धांतप्रिय स्वभावाचा राहील. परंतु शनीची स्थिती योग्य नसल्यास तो तापट, दुर्बळ आणि आळशी असेल.