शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शुभ कार्यांचे निमंत्रण पत्र केव्हा लिहायचे असतात

या प्रकारे द्या निमंत्रण, तर निर्विघ्न पूर्ण होतील मंगल-कार्य... 
कुठले ही शुभ कार्य असो किंवा आनंदाचे प्रसंग, या प्रसंगी आपण आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना निमंत्रण देतो, पण तुम्हाला माहीत आहे की निमंत्रण पत्र देण्याचे देखील एक शुभ वेळ असते. ज्याने सर्व कार्य मंगलपूर्वक संपन्न होतात.  
जाणून घेऊ, ज्योतिषीच्या माध्यमाने कोणत्या शुभ कार्यांवर आम्हाला कोणत्या वेळेस निमंत्रण पत्र लिहायला पाहिजे. 

चंद्र : हा मुहूर्ताचा आधार आहे म्हणून जेव्हा चंद्र बळी असतो, तेव्हा निमंत्रण पत्र लिहायला पाहिजे. शुक्ल पक्षाच्या दशमीपासून कृष्ण पक्षाच्या पंचमी पर्यंत चंद्र पूर्ण बळी असतो. शुक्ल पक्षाची प्रथमापासून दशमीपर्यंत मध्यम बळी आणि कृष्ण पक्षाच्या पंचमीपासून अमावास्यांपर्यंत बलहीन असतो.  

वार आणि तिथी : बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार श्रेष्ठ आहे. याच्यात जर बुधवारी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी असेल, गुरुवारी पंचमी, दशमी किंवा पौर्णिमा, शुक्रवारी तृतीया, अष्टमी व त्रयोदशी असेल तर अती उत्तम योग असतो. ज्या दिवशी कार्याची सुरुवात कराल, त्या दिवशीचा ग्रह (बुध, गुरु, शुक्र) पाप ग्रहांशी युत किंवा दृष्ट नसायला पाहिजे. 
 
नक्षत्र : जर चंद्र स्वाती, पुनर्वसू, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, अश्विनी आणि हस्त नक्षत्रात असेल आणि पंचम भाव शुभ असेल.  

पुत्र विवाह : ज्या दिवशी निमंत्रण द्यायचे असेल, त्या वेळेसची लग्न कुंडलीत सप्तम भाव, द्वितीय स्थान व त्याचे स्वामी आणि स्त्री कारक शुक्र, शुभ प्रभावात असेल, पाप ग्रहां(शनी, राहू, केतू, सूर्य, मंगळ)शी युती-दृष्टी नसायला पाहिजे. तेव्हा निमंत्रण लिहायला पाहिजे. 

 
पुत्री-विवाह : सप्तम भाव, द्वितीय यांचे स्वामी आणि गुरु (स्त्रीसाठी गुरु पती असतो) शुभ ग्रहांनी युत किंवा दृष्ट असेल (उच्च, स्वग्रही, मित्र राशीत, शुभ नवांशमध्ये) तेव्हा लिहा.  

भवन : चतुर्थ भाव, याचा स्वामी ग्रह आणि मंगळ शुभ प्रभावात असेल व बळी असेल, तेव्हा गृह प्रवेशाचे निमंत्रण लिहायला पाहिजे.

 
पुत्र जन्मोत्सव : पंचम भाव, त्याचा स्वामी आणि गुरु पाप प्रभावात नसेल. त्याशिवाय चौघडिया इत्यादी बघून आणि गणपतीचे ध्यान करूनच निमंत्रण पत्र लिहायला पाहिजे, याआधी मनात सामर्थ्यानुसार संकल्प घ्या आणि कार्य निर्विघ्न पूर्ण झाल्यावर त्या संकल्पाला पूर्ण करा.