शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सेव्हिंग करण्याअगोदर लक्षात ठेवा या गोष्टी, मिळतील शुभ परिणाम

बँकेत फिक्स डिपाजिट करण्या अगोदर किंवा बँकेत खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या मुहूर्तांना उत्तम मानले गेले आहे. जीवन विमा तथा वस्तूंच्या विमेसाठी याच मुहूर्तांमध्ये आवेदन पत्रावर हस्ताक्षर करणे उत्तम मानले गेले आहे. कृष्णपक्षाची द्वितीया, तृतीया, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, दशमी तथा एकादशी, द्वादशी तिथींमध्ये तथा शुक्लपक्षाची द्वितीया, तृतीया, षष्ठी, सप्तमी, अष्टमी तथा त्रयोदशी तिथी असो आणि या तिथींमध्ये सोमवार, वीरवार किंवा शनिवार असेल तसेच अश्विनी, पुनर्वसू, पुष्य हस्त, चित्रा, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा आणि रेवती इत्यादींमधून एखादे कोणते नक्षत्र असेल तर अशा मुहूर्तावर एकत्र करण्यात आलेले धन शुभ परिणाम देतात.  
 
व्याज कमावण्याचा उद्देशाने जेव्हा एखादा व्यक्ती, संस्था किंवा सावकार रुपया उधार देतो तेव्हा त्याला ही कृष्णपक्षाची प्रतिपदा, उभयपक्षांची द्वितीया, तृतीया, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, दशमी, एकादशी, द्वादशी तथा शुक्लपक्षाची त्रयोदशी व पौर्णिमे तिथीचा वापर केला पाहिजे. वर दिलेल्या तिथींपैकी अश्विनी, पुनर्वसू, चित्रा, अनुराधा, मृगशिरा, पुष्य, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा तथा रेवती इत्यादींमधून कुठलेही एक नक्षत्र असेल तर फारच उत्तम मानले जाते. शनिवार, वीरवार, शुक्रवार तथा सोमवारचा दिवस उधार किंवा ऋण देण्यासाठी चांगले मानले जातात.  
 
पैशाचे घेवाण देवाण, जमा संग्रह इत्यादीसाठी मंगळवार, संक्रांतीचा दिवस, संक्रांती युक्त रविवारचा दिवस, मूल, आद्र्रा, ज्येष्ठा, विशाखा, कृत्तिका, धु्रवसंज्ञक नक्षत्र अर्थात उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढ़ा तथा उत्तराभाद्रपदा एवं रोहिणी आदी नक्षत्रांचा प्रयोग नाही करायला पाहिजे.