testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पायांच्या बोटांवरुन असा ओळखा लोकांचा स्वभाव

foot reading
Last Modified शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (15:16 IST)
जगातील सर्वात महान नियोजकांच्या पायाचा आकार बघितल्यास लक्षात येईल की, त्यांचे अंगठ्याजवळचे बोट सर्वात मोठे व बाकी बोटे त्यापेक्षा छोटी असतात. अशा व्यक्ती प्रत्येक काम बारकाईने करतात. यांच्या योजना नेहमी यशस्वी होतात.
कोणाच्या पायाचा अंगठा लांब असेल व बाकी बोटे छोटी किंवा एकसारखी असतील तर अशा व्यक्ती खूप शांत व सावकाशपणे काम करणाऱ्या असतात. या व्यक्ती आरामात कोणतीही समस्या सोडवतात. आपल्या विरोधकांचा उत्तम सामना या व्यक्ती करतात.

अंगठ्याजवळचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असणे अशा व्यक्ती फार ऊर्जावान असतात. यांना थकवा येत नाही. यांना नेहमी वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. अनेकदा हे लोक इतक्‍या उत्साहाने व वेगाने काम करतात की लोक त्यांना मशीन म्हणायला लागतात.
जर कुणाच्या पायाची बोटे अंगठ्यापासून उतरत्या क्रमाने असतील तर असे लोक दुसऱ्यांवर अधिकार गाजवणारे असतात. यांचे मत असते की, दुसऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकावे. पती-पत्नी दोघांचीही बोटे उतरत्या क्रमात असतील तर त्यांच्यात नेहमी वाद होतात.

अंगठा व बाजूची दोन बोटे सारख्या उंचीची असलेले लोक फार मेहनती, नम्र व जबाबदार असतात. ही माणसे विनाकारण वादात अडकत नाहीत. कोणालाही त्रास देण्याचा यांचा स्वभाव नसतो. अशी व्यक्ती आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात मिळणे मोठी भाग्याची गोष्ट असते.


यावर अधिक वाचा :