शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

निर्दयी असते या महिन्यात जन्मलेली स्त्री, जाणून घ्या स्वत:बद्दलही

ज्योतिष शास्त्राप्रमाणे स्त्रियांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्याने ओळखला जाऊ शकतो. येथे प्रस्तुत हे महिन्याप्रमाणे स्त्रीचा स्वभाव:


चैत्र: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री वक्ता, हुशार, रागीट, सुंदर नेत्र असणारी, सुंदर रूप, गौर वर्ण, धनवान, पुत्रवती आणि सर्व सुख प्राप्त करणारी असते.
 
वैशाख: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री पतिव्रता, कोमळ स्वभाव, सुंदर हृदय, मोठे नेत्र असणारी, धनवान, रागीट आणि मितव्ययी असते.
 
ज्येष्ठ: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री बुद्धिमान, धनवान, तीर्थ यात्रा करणारी, कुशल आणि आपल्या पतीला प्रिय असते.

आषाढ: या महिन्यात उत्पन्न स्त्री संतानवान, धनहीन, सुख भोगणारी, सीधी आणि पतीला प्रिय असते.

श्रावण: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री पवित्र, लठ्ठ, क्षमा करणारी, सुंदर, धार्मिक आणि सुख प्राप्त करणारी असते.
 
भाद्र: या महिन्यात जन्म घेणारी स्त्री कोमल, धन व पुत्र प्राप्त करणारी, घरगुती, सदैव प्रसन्नचित्त राहणारी, सुशील आणि मधुर बोलणारी असते.
 
आश्विन: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री सुखी, धनी, शुद्ध हृदय, गुणवती आणि रूपवान असते. कुशल असनू या स्त्रीयांची कार्यक्षमता अधिक असते.
 
कार्तिक: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री कुटिल स्वभावाची, चतुर, खोटं बोलणारी, निर्दयी आणि धनाचा सुख भोगणारी असते.

मागशीर्ष: मागशीर्ष महिन्यात जन्म घेणारी स्त्री पवित्र, मधुर बोलणारी, दयाळु, दान, धन, धर्म करणारी, कार्य कुशल आणि रक्षा करणारी असते.
 
पौष: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री पुरुषासारख्या स्वभावाची, पतीकडून बहिष्कृत, समाजात गर्व ठेवणारी आणि रागीट असते.
 
माघ: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री धनी, भाग्यवान, बुद्धिमान, संतान सुख भोगणारी, कटु पण सत्य वचनी असते.
 
फाल्गुन: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री सर्व गुण संपन्न, ऐश्वर्य प्राप्त करणारी, सुखी, तीर्थ यात्रा करणारी व कल्याणाकारी असते.