शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (17:35 IST)

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी कसे राहील नवीन वर्ष!

पंतप्रधान मोदी यांच्या पत्रिकेत लग्नाहून शनीची छाया मागच्या अडीच वर्षांपासून दिसत आहे, ती आता 26 जानेवारी नंतर दूर होईल. जो विरोध आतापर्यंत चालत येत आहे, तो आता हळू हळू दूर होईल.    
 
आतापर्यंत होणारी मानसिक अशांती दूर होईल. मंगळाचा प्रभाव वाढेल जो आतापर्यंत शनीच्या वर्चस्वावर होता. शनीचे भ्रमण 26 जानेवारी नंतर धनू राशीत द्वितीय भावापासून होणार आहे याने जनतेत लोकप्रियता वाढेल. देशाच्या राजकारणात पडलेला बदल स्पष्ट दिसून येईल. 
 
आरोग्य उत्तम राहील व आधीपेक्षा जास्त स्वस्थ व स्फूर्तिवान दिसतील. सध्याच्या काळातील आर्थिक परिस्थितीला मोदींना जबाबदार ठरवण्यात येत आहे ते गुरुच्या कन्या राशीत असल्यामुळे व पंचम भावावर राहूची दृष्टी पडल्याने झाले आहे. 16 सप्टेंबर नंतर गुरु तुला राशीत आल्यानंतर वातावरण आशावादी आणि सुधारजनक राहील. राजकारण प्रकरण संपुष्टात येण्याची शक्यता वाढत आहे.  
 
शत्रुपक्षावर प्रभाव वाढेल, तसेच बाहेरील शत्रूंकडून मुक्ती मिळेल. विदेश संबंधी प्रकरणात सावधगिरीने चालावे लागणार आहे. स्त्रियांच्या बाबतीत कुठलेही सकारात्मक वातावरण नाही राहणार आहे. शनीचे भ्रमण वाणी भावात सम असल्याने वाणीचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल.