शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या राशींवर भारी आहे शनी, जाणून घ्या कोणत्या राशीवर त्याच्या काय प्रभाव पडत आहे

नवग्रहात शनी एकमात्र असा ग्रह आहे, जो कुठल्याही राशीत किमान अडीच वर्षांपर्यंत राहतो. मंद गतीने चालल्यामुळे शनै: शनै: करून पुढे वाढतो अर्थात हा एक मंद गती असणारा ग्रह आहे. जो एक राशीतून दुसर्‍या राशीतपर्यंत जाण्यास अडीच वर्ष लावतो. शनीची एकूण दशा 19 वर्षाची असते आणि त्याशिवाय साडेसाती आणि दोन ढैय्याचा वेळ त्यात जोडण्यात आला तर शनी एखाद्याच्या जीवनात किमान 31 वर्षांपर्यंत प्रभावित करतो. साल तक प्रभावित करता है शनी 30 वर्षात परत त्याच राशीत येतो म्हणून एखाद्याच्या जीवनात तिनापेक्षा जास्तवेळ साडेसाती येत नाही. सामान्यतः: व्यक्ती तिसरी साडेसातीच्या दरम्यान अनंतात विलीन होऊन जातो.  
 
हेच कारण आहे की जीवनात जास्त उपाय शनीसाठी केले जातात. शनी जेव्हा एका राशीत राहतो तेव्हा तो त्या राशीच्या मागची पुढची राशीवर आपली दृष्टी कायम ठेवतो. शनी सध्या धनू राशीत वास करत आहे, साडेसातीचा प्रभाव वृश्चिक, धनू आणि मकर वर चालत आहे. वृषभ आणि कन्या राशीवर ढैय्या भारी आहे. शनी एखाद्याच्या जीनवात काय फळ देईल शुभ प्रभाव होतील किंवा अशुभ, याचे विवेचन, पत्रिकेचे 2 भाव, 12 रास, 27 नक्षत्र, शनीची दृष्टी, त्याची गती, वक्री किंवा मार्गी स्थिती, कारकतत्व, जातकाची दशा, गोचर, साडेसाती किंवा ढैय्या, ग्रहांचे नीच, उच्च किंवा शत्रू असणे किंवा इतर ग्रह सोबत असणे, ग्रहाची डिग्री, विशेष योग, पत्रिकेतील नवांश इत्यादीच्या आधारावर केला जातो, फक्त एका सूत्रातून नाही.  
 
वास्तविकतेत शनी हा न्यायाधीश ग्रह आहे जो प्रकृतीत संतुलन कायम ठेवतो व प्रत्येक प्राणीसोबत न्याय करतो. जे लोक अनुचित विषमता व अस्वाभाविकता आणि अन्यायाला आश्रय देतात, शनी फक्त त्यांनाच सतावतो. हे उपाय केल्याने शनी प्रसन्न राहतील -
 
गरिबांना जोडे चपला भेट स्वरूप द्या.  
 
अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून अंघोळ करावी.  
 
प्रत्येक शनीवारी पिंपळाची पूजा करावी.  
 
मंगळवार आणि शनिवारी मारुतीला लाडवाचा प्रसाद दाखवावा.   
 
काळ्या गायीची सेवा करावी.