testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शनीच्या राशी परिवर्तनामुळे बर्‍याच राशींचे भाग्य चमकेल

26 ऑक्टोबर 2017 पासून शनी अडीच वर्षांनंतर धनू राशीत आला आहे. आता 24 जानेवारी 2020पर्यंत शनी या राशीत राहणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या जातकांना लाभ तर काहींना नुकसान होण्याची शक्यता आहे. शनी न्यायकारक ग्रह आहे. म्हणून जातकांना कोर्ट कचेरीचे चक्कर लावावे लागतात. शनीमुळे धनहानी आणि स्थान परिवर्तनाचा देखील योग बनत आहे. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कसे राहतील हे परिवर्तन :

मेष राशीच्या
जातकांसाठी वेळ अनुकूल आहे. नवीन लोकांच्या भेटीचा योग आहे. मोठे सौदे आणि व्यापारात भाग्याचा साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सरकारी कामांमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रतियोगी परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी भांडे आणि काळ्या कपड्याचे दान करावे.


वृषभ राशीच्या जातकांच्या कामांमध्ये बदल होण्याची योग दिसून येत आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थिती साधारण राहणार आहे. इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही एखादे दुसरे काम देखील करू शकता. शेयर, कमोडिटी इत्यादींत पैसे लावू नये. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा अन्यथा विवादात अडकू शकता. डोळे, कान, नाक आणि गळा किंवा पोटाशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे. गृहस्थ विवाहेतर संबंधांपासून स्वत:चा बचाव करा. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो.

नकारात्मकता कमी करण्यासाठी प्रत्येक शनीवारी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावावा.


मिथुन
राशीच्या जातकांसाठी वेळ अनुकूल नाही आहे. राजनीती किंवा सामाजिक कार्य करणार्‍या लोकांनी सावध राहणे फारच गरजेचे आहे. प्रतिष्ठेवर डाग लागण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहा. बायकोमुळे भाग्य वृद्धी होऊ शकते. विचार करून बोला. खर्च वाढू शकतात. कुटुंबीयांचे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. काही अप्रिय घटना घडू शकतात. गुडघ्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. विवाह योग्य जातकांना शनीमुळे अडचणी येतील. घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की यश मिळेल. नकारात्मकता कमी करण्यासाठी कुत्र्याला पोटी आणि पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.


कर्क राशीच्या जातकांना कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. कर्क राशीपासून शनी सहाव्या भावात जाईल. सहाव्या भाव रोग दुःख ऋण शत्रू इत्यादीच्या भाव असल्यामुळे तुम्हाला आरोग्य विषयक त्रास होण्याची शक्यता आहे. अधिकार्‍यांशी विवाद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणे टाळा. जोडीदारासोबत विवाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल. परदेश गमनचे योग बनत आहे. कमरेखालच्या भागात त्रास होण्याची शक्यता आहे. गुडघ्यात त्रास होऊ शकतो. नकारात्मकता कमी करण्यासाठी शनीवारी शनी मंदिरात बदाम चढवायला पाहिजे.


सिंह राशीच्या जातकांना पैशांची काळजी राहणार आहे. शेअर मार्केटशी निगडित लोकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. मोठे जोखीम घेऊ नका. प्रेमविवाहाचे योग बनत आहे. कमाईत वाढ होईल. कार्य स्थळावर मान सन्मान मिळेल. व्यर्थ पैसा खर्च करू नका. बँक किंवा इतर संस्थेकडून घेतलेले कर्ज तुम्ही संपुष्टात आणाल. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहणे गरजेचे आहे. पोटाशी निगडित आजार होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांना देखील सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी ढोरांना भात खाऊ घाला.

कन्या राशीच्या जातकांना रागावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. मानसिक रुपेण शांत राहणेच श्रेयस्कर ठरेल. संपत्ती संबंधी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय या दिवसांमध्ये घेऊ शकता. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कर्ज घेऊ नका. लवकर पैसे कमावायचे लालच करू नका. अनुभवी व्यक्तीच्या सल्लाने गुंतवणूक करा. जोखीम घेण्यापासून स्वत:चा बचाव करा.

हृदय रोग्यांना सांभाळून राहणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. घर, वाहन आणि पैतृक संपतीच्या बाबतीत विघ्न येऊ शकतात. संतानं सुख मिळण्याचे योग आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी शनीवारी हनुमानाला चमेलीचे तेल आणि शेंदूर चढवा.

तुला राशीच्या जातकांना साडेसातीपासून सुटकारा मिळणार आहे. त्रासांपासून मुक्ती मिळेल. वेळ शुभ आहे. मोठे निर्णय घेऊ शकता. यात्रा आणि धन लाभाची शक्यता बनत आहे. आपली परिस्थितीबघून खर्च करणे शिका. बर्‍याच बाबतीत भाग्याचा साथ मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. फायदा देणारे काही निर्णय अचानक घेऊ शकता. दांपत्य जीवनात थोडा त्रास शक्यतो. जोडीदारासोबत संबंध खराब होण्याची शक्यता आहे. नकारात्मकतेसाठी बचाव करण्यासाठी काळ्या कपड्यात उडीद आणि चमेलीचे तेल ठेवून दान करा.


वृश्चिक राशीच्या जातकांना शनी परिवर्तनामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनात व्याधी येण्याची शक्यता आहे. भांडण आणि विवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्ष उत्तम राहणार आहे. व्यर्थ खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. दांपत्य जीवनात त्रास शक्यतो. कुठल्याही प्रकारचे गुंतवणूक करण्याअगोदर अनुभवी लोकांचा सल्ला निश्चित घ्या. भौतिक सुख –सुविधा वाढू शकते. आरोग्य उत्तम राहणार आहे पण बारीक सारीक अपघात होण्याची शक्यता देखील आहे म्हणून सावधगिरी बाळगा. नकारात्मकता कमी करण्यासाठी कुत्रे आणि कावळ्यांना पोळी खाऊ घाला.


धनू राशीच्या जातकांना सावधगिरी बाळगायला पाहिजे. पराक्रमाच्या बळावर यश मिळेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. बढतीचे योग आहे. मानसिक तणाव आणि त्रास वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवू नका. शनीच्या बदलामुळे तुमच्या मेहनतीचे फळ दुसर्‍या कोणाला मिळण्याची शक्यता आहे. धर्म आणि अध्यात्मात विश्वास वाढेल. दांपत्य सुखात काही कमी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नाक, कान, गळा, डोळा इत्यादींचा त्रास होण्याची शक्यता आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी मारुतीच्या पायाच्या शेंदूर आपल्या मस्तकावर लावा.


मकर राशीच्या जातकांना शनीची साडेसाती सुरू झाली आहे. नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे. खर्च वाढेल. विदेश यात्रेचे योग बनत आहे. बेकायदेशीर कामांपासून दूर राहा, नाहीतर कोर्ट कचेरीच्या चक्रामध्ये अडकू शकता. धार्मिक कामात आवड निर्माण होईल. बचत संपेल. धनहानीचे योग बनत आहे. विचार करून गुंतवणूक करा. आरोग्याशी निगडित त्रास वाढण्याची शक्यता आहे. जुने आजार त्रास देतील. ऑपरेशन होण्याची शक्यता वाढत आहे. नकारात्मकता कमी करण्यासाठी सुंदरकांडचा पाठ करावा.


कुंभ राशीच्या जातकांसाठी वेळ चांगला आहे. कामात बदल होऊ शकतात. काही निर्णयांमुळे मानसिक तणाव वाढेल. मेहनत आणि कार्य कुशलतेमुळे कमाई वाढणार आहे. कार्य स्थळावर पुढे जाण्याचे योग बनतील. म्युच्युअल फंड, इंटरनेट, शेयर, स्टॉक मार्केट, कमोडिटी इत्यादींपासून धन लाभ होण्याचे योग बनत आहे. आरोग्याच्या दृष्टीने शनीची स्थिती खराब नाही आहे. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. सर्दी, खोकला किंवा सांधे दुखीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. संतानच्या बाबतीत अडचण येण्याची शक्यता आहे. गर्भवती स्त्रियांना सावधगिरी बाळगायला पाहिजे. मान सन्मान मिळेल. नकारात्मकता दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.


मीन राशीच्या जातकांमध्ये शनी परिवर्तनामुळे कामाची गती मंद पडेल. नोकरी आणि व्यापारात जोखिमीचा निर्णय घेऊ नका.

नवीन काम करण्याअगोदर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. अधिकार्‍यांचा नोकरी करणार्‍या व्यक्तींशी विवाद होण्याची शक्यता आहे. जुने गुंतवणूक फायदा देतील. पोट आणि डोळ्याशी संबंधित तक्रार राहणार आहे. सांधे दुखी आणि जुने आजार त्रास देतील. आई वडिलांबद्दल थोडे चिंतित व्हाल. घर, वाहन किंवा कुठल्याही प्रकारची संपत्तीवर तुमचे खर्च होतील. जोडीदारावर राग
काढू नका. बेरोजगार लोकांसाठी वेळ उत्तम आहे. नकारात्मकतेला कमी करण्यासाठी शनीवारी वाहत्या पाण्यात तांदूळ सोडा.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...
Widgets Magazine

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...