गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (12:18 IST)

शनीचे राशी परिवर्तन, कोणत्या राशीवर साडेसातीचा काय प्रभाव पडेल...

ग्रह-नक्षत्र परत एकदा बदलणार आहे. यंदा शनी सारखा पराक्रमी आणि बलवान ग्रह अडीच वर्षांनंतर स्थान परिवर्तन करणार आहे. 26 जानेवारीपासून संध्याकाळी 7.28 मिनिटाने भारतीय वेळेनुसार शनी वृश्चिक राशीतून धनू राशीत विराजमान होणार आहे. 
 
शनीच्या या भ्रमणामुळे सर्व ग्रह-नक्षत्रांमध्ये हालचाल स्वाभाविक असते. महत्त्वाचे म्हणजे सूर्य, शनी, राहू आणि केतूच्या राशी परिवर्तनामुळे सर्वात जास्त प्रभाव दिसून येणार आहे.     
 
या महत्त्वपूर्ण राशी परिवर्तनामुळे सर्व राश्यांवर प्रभाव पडणार आहे. शनिच्या राशी परिवर्तनामुळे बर्‍याच राश्यांवर सुरू असलेली साडेसाती संपणार आहे तर कुणा राशीवर सुरू होणार आहे. तर जाणून घेऊ कोणत्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होत आहे आणि कोणावर संपत आहे तसेच याचा प्रभाव कसा राहील?  
मेष आणि सिंह राशीवर साडेसातीचा एक ढैय्या संपत आहे ज्याचा प्रभाव संमिश्र राहणार आहे. उतरत असलेल्या साडेसातीचे बरेच फळ मिळतात ज्यात लाभ-हानी दोन्ही होते, पण फायदा जास्त होते. 
 
लक्ष्य ठेवण्यासारखे म्हणजे या राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल किंवा ढैय्या सुरू होईल. मकर, वृषभ आणि कन्या राशीवर साडेसाती सुरू होईल. या राशींसाठी वेळ चांगला नाही आहे. आर्थिक हानी, मानसिक तणाव आणि इतर त्रास संभवतात.  
 
त्याच प्रकारे वृषभ आणि कन्या राशीवर पहिला ढैय्या, धनू राशीवर दुसरा ढैय्या आणि वृश्चिकावर साडेसातीचा तिसरा ढैय्या सुरू होईल. या राश्यांसाठी वेळ चांगला नाही आहे. लोखंडाच्या व्यापाराशी संबंधित काम करणार्‍या लोकांनी सावध राहिला पाहिजे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.   
 
शनीची कृपा आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिसूक्त, शनी स्तोत्राचे नियमित पाठ करण्याने लाभ मिळेल.  प्रत्येक शनिवारी हनुमान चाळिसाचे 21 पाठ करणे, शनिदेवाला तेल अर्पण केल्याने देखील लाभ मिळेल. पिंपळाच्या झाडाला पाणी देणे आणि सरसोचे तेल चढवल्याने देखील फायदा होण्याची शक्यता आहे आणि साडेसातीचा त्रास थोडा कमी होईल.