शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

शिंक येणे काही ठिकाणी अशुभ तर काही ठिकाणी शुभ!

WD
शिंक येणे काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. त्यातील काही शुभ व अशुभ घटना खाली सांगितल्या आहेत.

ुभ संकेत :
तुम्ही घरातून बाहेर पडत असताना कोणी शिंकले तर तुमच्या कामात अडथळा निर्माण होणार. तीच व्यक्ती एकपेक्षा जास्त वेळेस शिंकली तर तेच काम सहजतेने पूर्ण होईल.

खरेदी करताना शिंक आली तर खरेदी केलेल्या वस्तुत फायदा होतो.

एखादा आजारी मनुष्य औषधी घेण्यासाठी निघाला आणि त्याला शिंक आली तर तो लवकर बरा होतो.

पुढे पहा शिंक येणे हे असे अशुभ असते


WD
अ‍शुभ संकेत :
जेवण करण्याच्या अगोदर शिंकेचा आवाज ऐकला तर अशुभ मानण्यात येते.

नवीन घरात प्रवेश करतांना शिंक आली तर त्या घरात त्यावेळेस प्रवेश करू नये.

घरात आलेला पाहुणा जाण्याच्या वेळेस कोणी त्याच्या डाव्या बाजूस शिंकले तर तो एक अशुभ संकेत असतो.