मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जिंकण्यासाठीच जन्म घेतात ह्या राशीचे लोक

यश आणि भाग्य  
यश हे फक्त भाग्यावर नव्हे तर मेहनत, योग्य दिशेत करण्यात आलेले प्रयत्न आणि सतत प्रयास, दृढ संकल्प, आत्मविश्वासावर निर्भर करत. भाग्यामुळे तुमचे मार्ग सोपे होऊन जातात पण जर यातून एकही बाब कमी असली तर तुम्ही यशाच्या जवळ जाऊन देखील ते मिळवण्यात अपयशी ठरता.
 
ज्योतिष शास्त्र
ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या पत्रिकेत गुरू, मंगळ आणि शनी शुभ स्थितीत असेल ते जन्मापासूनच यश आपल्यासोबत घेऊन जन्माला येतात. शुभ शनीच्या स्वरूपात भाग्य जेथे मार्ग सोपे करतो आणि मंगळ त्यांना यश देण्यास इतर गरजेचे वैशिष्ट्ये देतो. 
 
राशी 
सर्व 12 राश्यांमध्ये तीन रास अशा असतात ज्यांच्यात हे उत्तम गुण असतात. तुम्ही म्हणू शकता की यांचा जन्मच चांदीचा चमचा घेऊन झाला असतो आणि हे जीवनात यशापासून आनंदी पारिवारिक जीवन, सुख समृद्धी, धन प्रतिष्ठा सर्व काही मिळवतात. 
 
ह्या तीन राश्या कोणत्या आहे हे जाणून घ्या....  
 
मेष (जन्मजात लीडर)
राशीत पहिला स्थान मिळवणारे हे जातक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेहमी पहिला स्थान मिळवतात. यांच्यात लीडरशिपची अद्भुत क्षमता असते. हे आत्मविश्वासी आणि हुशार असतात आणि आपल्या बलबुत्यावर जीवन घालवणे पसंत करतात. यासाठी ते 
कुठलीही कसर सोडत नाही. यांना भावनांवर पूर्ण नियंत्रण असत पण यांची व्यावहारिकता बर्‍याच वेळा लोकांना आवडत नाही.  
 
मेष राशीचे जातक आपल्या कामात आणि स्वभावात पूर्णपणे इमानदार असतात, हेच कारण आहे की दुसर्‍यांकडून देखील हे हीच अपेक्षा करतात. हे एक यशस्वी व्यक्ती असून एक प्रभावशाली बॉस, नेता आणि वैज्ञानिक देखील असतात, ज्या क्षेत्रात जातात तेथे आपला प्रभाव कायम करून प्रसिद्धी मिळवतात.  
 
धनू (क्रांतिकारी)
यांचा क्रांतिकारी स्वभावच यांच्या यशाचे कारण आहे. आपल्या जीवनात हे फारच साधारण असतात आणि त्याला यशस्वी करण्यासाठी ते फार मेहनत करतात.  
 
यांच्या जीवनात अनुशासनाचा फार महत्त्व असतो, हेच कारण आहे की हे नियमांवर चालणे पसंत करतात आणि दुसर्‍यांकडून देखील हीच अपेक्षा करतात. हे स्वत:ला ‘सेल्फमेड’म्हणणे पसंत करतात आणि याच रूपात आपली ओळख देखील बनवतात. 
 
मकर (यशाचे दुसरे नाव)
सर्व 12 राशींमध्ये हे ते जातक आहे ज्यांना जीवनात कुठल्याही गोष्टींसाठी मुकावं लागत नाही. पारिवारिक आनंदापासून प्रतिष्ठा सन्मान, धन-वैभव प्रत्येक गोष्ट यांना मिळते. यांना बालपणापासूनच ह्या सर्व गोष्टी मिळतात.
 
कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेथे हे उंच पदावर जातात, तसेच प्राशासनिक क्षेत्राशी जुळले तर तेथे देखील प्रसिद्धी मिळवतात. प्रभावशाली वक्तासोबतच हे एक प्रभावशाली नेता देखील असतात आणि आत्मविश्वास तर यांच्यात भरपूर असतो. हे फार हुशार असतात.