शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

जिभेवरही असतात ग्रह

- पं. अशोक पवार

ग्रहांचा मानवी जीवनात प्रभाव पडत असतो. भविष्याचे संकेत हे ग्रह आपल्याला देत असतात. सर्वांत प्रथम लग्न स्वत:ला दर्शवितो, त्यानंतर सप्तममध्ये तो आपल्या जीवनसाथीचा भाव असतो. चतुर्थ भाव स्वत:च्या कुटुंबाचा तर पंचम भाव प्रेमाचा असतो. नवावा भाव भाग्याचा समजला जातो.

द्वितीय भावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा भाव वाणी आणि महिलांच्या कुंडलीत सौभाग्याचा असतो. पुरूषांच्या कुंडलीत आठवा भाव महिलांबाबत असतो. हे सर्व भाव ओळखून जीवनसाथी मिळाल्यास जीवन सुखी होईल.

द्वितीय भाव वाणीचा असल्याने सर्वांत प्रथम आपल्या जीवनसाथीची वाणी तपासून घेतली पाहिजे. त्याचे बोलणे गोड आहे की नाही, हे पाहावे. द्वितीय भावात कनिष्ठ केतू असू नये. सूर्य, शनी असेल तर वाणीत दोष असेल. मंगळ शनी असेल तर महिलांच्या कुंडलीत सौभाग्यास हानी पोहचू शकते.

WD
ज्या प्रकारे मंगळाच्या कुंडलीचे दोष अन्य भावात असतो त्याच प्रकारे द्वितीय भावही त्यापासून लांब असू शकत नाही. कनिष्ठ राहू या भावात वाणीस दूषित करतो. चंद्र- राहूची परिस्थिती योग्य नसते. या भागात शुक्र आणि गुरु स्वराशीचा असेल तर बोलण्यात प्रामाणिकपणा, स्पष्टता आणि माधुर्य असेल.

मंगळ स्वराशीचा असेल तर वाणी कडक असेल. बुध असेल तर वाणीत बदल्याची भाषा असेल. सूर्य असल्यास वाणीत तेज आणि प्रभाव असेल. शुक्र-चंद्र बरोबर असेल तर कलात्मक भाषा बोलणारा आणि विनोदी स्वभावाचा व्यक्ती असेल.