testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

See Video साप्ताहिक राशीफल : 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2017

weekly rashifal

मेष
: या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश करत आहे अर्थात तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित फल देणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत यात्रा-प्रवास, भौतिक सुख आणि आर्थिक किंवा सार्वजनिक जीवनासाठी शुभ दिसून येत आहे. नोकरी व्यवसायात आपले तत्व
सोडून कोणतेही काम करू नका. नवीन करार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करणे तूर्त टाळावे. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. मोठ्या व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. आठवड्याचा मध्य आणि शेवटचा टप्पा सामान्य समस्यांमध्ये घालवण्यानंतर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात सफल होऊ शकता. तुमच्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध बनतील अशी शक्यता घडून येत आहे. एखाद्या कलेत रुची वाढेल किंवा कला विषयक एखादा प्रोग्रॅम किंवा कार्यक्रम बघण्याचा योग बनेल.

वृषभ: या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत अर्थात स्वत:च्या उच्च राशीत प्रवेश करत आहे, जे तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. या आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी फारच शुभ आणि आर्थिक, व्यावसायिक व नोकरी संबंधी यश मिळवून देणारा ठरणारा आहे. ज्या लोकांची विदेश जाण्याची गोष्ट सुरू आहे अथवा या दिशेत प्रयत्न सुरू आहे, त्यांच्यासाठी आशाजनक वेळ आहे. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या वाक्चातुर्याने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. संतांचा सहवास लाभेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील. प्रिय व्यक्तीसोबत रेस्टोरेंट, शॉपिंग, सिनेमा इत्यादी जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. कदाचित विवाहेतर संबंध तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण आणू शकता, म्हणून अनैतिक किंवा विवाहेतर संबंधांपासून दूर राहा. आठवड्याचा शेवटचा टप्पा थोडे विघ्न आणि त्रासदायक ठरू शकतात. आरोग्य विषयक काळजी घेणे गरजेचे आहे.
मिथुन: या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश अर्थात आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. प्रतिस्पर्धांची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्चितता जाणवेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नावलौकिक मिळेल. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. तुम्हाला आरोग्यविषयक लहान सहन तक्रारी राहण्याची शक्यता आहे. एकूण प्रत्येक गोष्टींकडे नजर घातली तर सुख-दुःखाची मिश्रित भावना राहील. आठवड्याचा शेवटचा भाग तुम्ही परिवार किंवा जोडीदारासोबत खूप चांगल्या प्रकारे घालवाल. दांपत्यजीवन किंवा भागीदारीच्या कामात जर कुठली अडचण किंवा गैरसमज होत असतील तर त्याचे समाधान होण्याची शक्यता आहे.

कर्क : या आठवड्यात मंगळ राशी बदलून तुमच्या राशीतून सातव्या भावात प्रवेश करत आहे. जे तुमचे दांपत्यजीवन आणि व्यावसायिक स्तरावर भागीदाराशी तक्रार किंवा तणाव निर्माण करण्याचे संकेत देत आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. विवाहेच्छुकतरुणांचे विवाह ठरतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायात उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक वापरले तर चांगली भरभराट होईल. जोडीदाराची पदोन्नती होईल. जनसंपर्कातून लाभ होतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग येतील. आठवड्याचे शेवटचे तीन दिवस तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे. उधार वसुली आणि आर्थिक प्रारुपांचे प्रत्येक कार्य पुढे वाढतील. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळणे आणि त्यात वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. शेयर बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी काळ शुभ आहे. इंट्रा-डे किंवा वायदा बाजारापासून दूर राहण्याचा सल्ला आहे.

सिंह : या आठवड्यात पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहीसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद लुटाल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वाहन-वास्तूचे योग येतील. प्रतिष्ठित व्यक्तीचे घराला पाय लागतील. प्रेम संबंधांमध्ये जर मतभेद असतील तर त्याचे सुखद समाधान निघतील. या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे अडकलेले सरकारी काम पूर्ण होतील. परिवार आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तन मन धनाने मेहनत करण्यासाठी सक्रिय राहाल. जमीन-मकान-वाहनाशी संबंधित शुभ समाचार मिळेल. या आठवड्यात तुम्हाला वित्तीय लाभ मिळत राहील.

कन्या : या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश करत आहे अर्थात तुमच्या राशीतून पाचव्या भावात मंगळ तुम्हाला संतानच्या बाबतीत काळजीत पाडेल किंवा संतान पक्षाकडून त्रास होण्याची शक्यता आहे. अर्थात दोन विरोधाभासी परिस्थिती निर्माण होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कवी, कलाकार, गायक,लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात षष्ठस्थ मंगळामुळे उष्णतेच्य विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या वाणी स्थानात सूर्य-बुधाचा बुधादित्य राजयोग बनत आहे, जो तुम्हाला वाणीद्वारे निश्चितच लाभ प्रदान करेल. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात
प्रॉपर्टीबाबत घेतलेल्या निर्णय किंवा खरीद-विक्रीचा सौदा लाभदायक सिद्ध होईल. या आठवड्यात लक्ष्मी अथवा इतर कोणत्याही स्रोत किंवा पाठ केल्याने फायदाच होईल.

तूळ : या आठवड्यात तुमच्या राशीतून चवथ्या भावात मंगळ हृदयात थोडी अशांती आणि परिवारात विसंवादाचे कारण बनू शकते. तुम्ही तुमची गोष्ट योग्य ठरवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीशी वाद घालाल ज्याने तुमचे संबंध खराब होण्याची शक्यता आहे. पण, वर्तमान वेळेत शनी मंगळाचे परिवर्तन प्रॉपर्टीमुळे लाभ मिळण्याचे संकेत देत आहे. बौद्धिक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठ्या यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. अडचणी कमी होतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आईच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे बिझनेस संबंधी काम पूर्ण होतील. ज्या जातकांच्या डोळ्यांना त्रास असेल किंवा डोके दुखीचा त्रास असेल तर त्यांचा त्रास जास्त वाढेल. प्रोफेशनल क्षेत्रात एखाद्या कामात जबाबदारी वाढेल आणि
सतर्कतापण ठेवावी लागणार आहे. या आठवड्यात न्यायालयिन खटला चालत असेल तर त्याचा निर्णय लागू शकतो. आठवड्याचा मध्य भाग तुमच्यासाठी थोडा उत्साह आणि उमंग देणारा असेल.

वृश्चिक
: या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीतून तिसर्‍या भावात मंगळाचे भ्रमण तुम्हाला हिंमत, साहस, पराक्रम आणि एक प्रकारचा विजय योग बनवेल. यातही मंगळ आणि शनीचा परिवर्तन योग आल्याने येणार्‍या 40 दिवसांमध्ये व्यावसायिक बांधणीवर कुठल्याही प्रकारचे बदल, नवीन कार्य पद्धती आत्मसात करणे किंवा सामान्यापेक्षा काही नवीन करण्यासाठी विचार करून पुढे जा. या वेळेस तुम्ही काम करण्यास मागे राहणार नाही म्हणून तुमच्या मेहनतीनुसार त्याचे परिणाम मिळत राहील पण अचानक मोठ्या लाभाची अपेक्षा करू नये. महिला जातकांना गर्भाशयाचा त्रास होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे, त्यांनी सावधगिरी बाळगायला पाहिजे. विद्यार्थी जातक या वेळेस प्रतियोगी परीक्षा देतील तर त्यात यश मिळेल. या आठवड्याच्या सुरुवात थोडी जास्त राहणार आहे. सरकारशी निगडित काम पूर्ण होतील. विपरीत लिंगी जातकांप्रती आकर्षण वाढेल.

धनू : या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीतून दुसर्‍या भावात उच्चाचा मंगळ तुम्हाला दूर स्थान किंवा विदेशातून लाभ प्राप्त करवून देऊ शकतो. पण याच्या समोर
खर्चाची मात्रा वाढेल. म्हणून आय-व्ययाचे संतुलन बनवून ठेवण्याचे
विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तुमच्यात जोष आणि ऊर्जांचे प्रमाण जास्त असेल, ज्याचा सकारात्मक उपयोग करून व्यावसायिक प्रगती करू शकाल. पण त्याच्या नकारात्मक उपयोग कराल तर राग वाढेल, जो तुमच्या खाली पडण्याचे कारण बनू शकतो आणि संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारात एखाद्या नवीन गुंतवणुकीची योजना आखू शकता. आठवड्याच्या मध्यभागात तुम्हाला वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. परिवारासाठी अथवा मौज मस्तीसाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे. वर्तमान काळात मंगळ आणि शनीचे परिवर्तन तुम्हाला आय तथा व्यय दोघांची मात्रा वाढवेल. या वेळेस विपरीत लिंग असणारे व्यक्तीच्या प्रती आकर्षण अधिक राहील. शारीरिक आकर्षणाचे प्रमाण जास्त असेल. एखाद्या वयाने मोठ्या व्यक्तीसोबत देखील तुमचे आकर्षण वाढेल.

मकर : या आठवड्यात तुम्ही कामात व्यस्त राहणार आहे ज्यामुळे कोणा दुसर्‍याबद्दल विचार करण्यासाठी वेळ देखील मिळणार नाही. नोकरी करणार्‍या जातकांना आपल्या कार्यस्थळासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे. अत्यधिक आनंद आणि तसेच फारच व्यस्ततेचा वेळ ठरणार आहे. मित्र आणि ओळखीच्या लोकांशी भेटीगाठी होतील. मंगळ मकर राशीत प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या स्वभावात थोडा बदल येऊ शकतो. तुमचा असा विचार राहील की प्रत्येक व्यक्ती तुमच्या निर्देशांचे पालन करेल. स्वभावात वर्चस्वाची भावना वाढेल. तुमचे दैनंदिन खर्चाच्या तुलनेत या वेळेस खर्चाची मात्रा वाढेल. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे. धार्मिक स्थळाच्या यात्रेचा कार्यक्रम बनेल. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक आवक वाढेल. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीत थोडे विघ्न सोडले तर संपूर्ण आठवडा चांगला जाणार आहे.

कुंभ : आठवड्याच्या सुरुवातीत मंगळ मकर राशीत प्रवेश करत आहे. सरकारी नोकरी करणार्‍या जातकांसाठी फार लाभाची संधी मिळणार आहे आणि वडिलांकडून देखील फायदा होई. ज्या जातकांचा स्वत:चा व्यवसाय आहे त्यांना देखील फायदा होईल. जमीन-मकानाची दलाली करणार्‍यांना फायदा होईल पण कुठलेही निर्णय घेताना थोडे धैर्य ठेवावे लागणार आहे. मित्रांकडून उत्तम सहयोग मिळेल. मोठ्या लोकांचे आशीर्वाद मिळाल्याने तुमची प्रगती होईल. भाऊ बहिणींची भेट होईल. जे लोक विदेशात आहे त्यांना देखील भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्याकडून कुठल्या मोठ्या कामासाठी मदत मिळताना दिसत आहे. घर-परिवारात आनंदाचे वातावरण राहील. पारिवारिक कार्यांमध्ये सध्या तुमचे खर्च वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. सार्वजनिक जीवनात तुमची सक्रियता वाढेल ज्यात तुम्ही एखाद्या शुभ कार्यात जाल आणि त्यात व्यस्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.
मीन :
या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिक कामात यश मिळे. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.संशोधनापार अभ्यासक्रमातून यश संपादन कराल. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम विनाप्रयासात मार्गी लागतील. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. लेखक,साहित्यिक, संपादक, प्रकाशक यांना चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले उज्ज्वल करणारा राहील. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. नवोदित कलाकारांना सुसंधी लाभतील.


यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

असा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...

national news
'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...

राम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा

national news
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...
Widgets Magazine

संगीत व नवी भाषा शिकल्याने जास्त प्रभावी होतो मेंदू

national news
एखादी नवी भाषा बोलण्यास शिकणे आणि वाद्य वाजविण्याचे कौशल्य प्राप्त केल्यामुळे आपला मेंदू ...

पत्नीसोबतचा डीपी ठेवला नाही, केली पोलीसात तक्रार

national news
उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमध्ये पतीने पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला नाही ...

सर्व इलेक्‍ट्रिक वाहने 2050 पर्यंत शक्‍य

national news
भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते ...

कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

national news
जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ...

अंदमानात मान्सून दाखल

national news
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून ...