testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ग्रहांचे खडे का धारण करतात?

stones
वेबदुनिया|
विवाह होत नसेल तर 'पुखराज', मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते कधी धारण करावे, याचे ज्ञान आपल्याला नसते. त्यामुळे कितीही ग्रहांचे खडे धारण केले तरी त्याचा फायदा होत नाही. ग्रहांचे खडे का व कधी धारण करावे? यासाठी आधी आपल्या कुंडलीचे सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे. लग्न कुंडली, नवमाश, ग्रहांचे बलाबल, दशा-महादशा आदींचा अभ्यास करून रत्न धारण करण्‍याचा सल्ला दिला जातो. विनाकारण रत्न धारण केल्याने ते नुकसानदायकही ठरू शकते.
मोती निराशाही देऊ शकतो. पोवळा रक्तदाब वाढवू शकतो तर अहंकार निर्माण करू शकतो.

सामान्यत: लग्न कुंडलीनुसार लग्न, नवम, पंचम रत्न धारण केले जाऊ शकतात. जे ग्रह शुभ भावाचे स्वामी असून पापाचा प्रभाव कमी करणारे असतात. श‍त्रुची कार्यक्षमता कमी करण्यासाठी कुंडली पाहूनच रत्न धारण करणे प्रभावशाली होत असते.

रत्न धारण करण्‍यापूर्वी दशा-महादशांचा अभ्यास आवश्यक असतो. केंद्र अथवा त्रिकोणाच्या स्वामीचा ग्रह ,महादशेत त्याच ग्रहाचा रत्न धारण करणे अधिक लाभदायी असते.

3, 6, 8, 12 चे स्वामी ग्रहांचे रत्न धारण करू नये. त्यांना शांत करण्यासाठी दान-मंत्र जपाचा आधार घ्यावा लागत असतो. रत्न निर्धारित केल्यानंतर त्याला धारण करण्‍याचाही एक विशिष्ट प्रकारचा विधी असतो. रत्न किंवा खडे हे अंगठी किंवा लॉकेटमध्ये सोने, चांदी, तांबे अथवा पितळ अशा धातूंमध्ये धारण करावे.

ग्रहासाठी शुभ असलेल्या दिवशी शुभ मुहुर्तावर रत्न धारण केले जाते. रत्न धारण करण्‍यापूर्वी कच्च्या दुधात दोन दिवस अगोदर टाकून ठेवावा. शुभ मुहुर्तावर ग्रहाचा मंत्र जप करून रत्नाचे शुध्दीकरण करावे. त्यानंतर परमेश्वराचे स्मरण करून रत्नावर अगरबत्ती ओवाळून प्रसन्नचित्ताने धारण करावा. अशा पध्दतीने रत्न धारण केला तर त्याचे पूर्ण फळ मिळते. मंत्र जप व रत्न शुध्दी करण्‍यासाठी ज्योतिष पंडित मदत घेतली जाऊ शकते.

शनी व राहु रत्ने कुंडलीचे सूक्ष्म निरिक्षण केल्यानंतरच धारण करावा अन्यथा भयंकर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ

national news
दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची कहाणी )

national news
श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान ...

मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत

national news
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर ...

मार्गशीर्ष गुरुवार: व्रत करण्याचे नियम

national news
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...