शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

अरेंज्ड की लव्ह मॅरेज!

किशोरावस्थेत सेटल झाल्याबरोबरच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लग्न केव्हा होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमची जन्म पत्रिका फारच महत्त्वाचे काम करते. सर्वात आधीतर हे बघणे जरूरी आहे की लग्नाचे योग आहे की नाही? पत्रिकेत सप्तम भाव विवाहाचा आणि व्यय भाव शैय्या सुखाचा असतो.

जर सप्तम भावाचा स्वामी सप्तम स्थानात असून बाकीचे सर्व ग्रह अनुकूल परिस्थितीत असतील व कुठलेही वाईट ग्रह किंवा निर्बळ नक्षत्राच्या प्रभावात नसतील तर विवाहाचा योग निश्चितच आहे. जर व्यय भाव आणि त्याच्या स्वामीची स्थिती चांगल्या स्थितीत असतील तर वैवाहिक सुख नक्कीच मिळेल.

लग्नाचा योग केव्हा येईल या गोष्टींवर लक्ष्य देणे गरजेचे आहे? आधी लग्नाचे सामान्य वय 23-24 वर्ष होते. जे आता वाढून 26-27 वर्ष झाले आहे. जर बाकी सर्व गोष्टी सामान्य असतील तर या वयापर्यंत विवाह निश्चित होतो. जर सप्तम भावावर मंगळाचा प्रभाव असेल तर विवाह 28 ते 30 च्या दरम्यान होतो.

जर सप्तम स्‍थानात शुक्र किंवा चंद्र असेल तर विवाह 24-25 वर्षात आणि शनी असेल तर विवाह 32 नंतर झालेले आढळून आले आहे. जर जन्मपत्रिकेत शनी 1, 4, 5, 9, 10 व्या भावाचा स्वामी असून सप्तममध्ये असेल आणि त्यावर गुरू किंवा शुक्राची दृष्टी पडत असेल तर लग्न लवकर होत. सप्तम भावात गुरू एकटा असेल तर लग्न उशीरा होत.


प्रेम विवाह : जर पंचम भावाचा स्वामी सप्तम भावात, लग्न किंवा व्यय भावाशी संबंध बनत असेल तर प्रेम विवाह किंवा परिचय विवाहाचा योग असतो. जर पंचमेश सप्तममध्ये किंवा सप्तमेश पंचममध्ये असेल तरी प्रेम विवाहाचा योग बनतो. जर पंचम किंवा सप्तमचा स्वामी व्यय भावात असेल तर मनाप्रमाणे विवाह होतो पण विवाह सुख मिळत नाही. जर पंचमेश किंवा सप्तमेश शुभ ग्रह असून राशी परिवर्तन करत असतील तर विवाह सुखमय आणि भाग्य वाढवणारा असतो. जर हे अशुभ ग्रह असतील तर वादविवाद कायम बनलेला असतो. सप्तमेशचे लग्नात असणेसुद्धा परिचय विवाहाचे संकेत आहे.

विशेष : जे लोक मंगळी असतात आणि जर त्यांचा प्रेमविवाहही होत असेल तर ते लोकं त्याच लोकांकडे आकर्षित होतात ज्यांची पत्रिका मंगळाहून प्रभावित असते किंवा पत्रिकेत शनी-राहू प्रबळ असतात. त्यामुळे त्यांचे आपसांत लग्न झालेतरी त्यांचा मंळग दोष नाहीसा होतो.