गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

गणपतीची मूर्ती घरात ठेवताना हे सहा नियम पाळावे

1. घराच्या प्रवेश दारा समोर : तुम्ही घरात बर्‍याच प्रकारच्या गणपतीची मूर्ती ठेवू शकता. तुम्ही घराच्या प्रवेश दारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकता. असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात समृद्धी आणतो. जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवता तर ते तुमच्या घराचे पालक बनतात. 
 
2. जोडीने ठेवावे : तुम्ही जेव्हा कधी घराच्या प्रवेश दारावर गणपतीची मूर्ती ठेवता तेव्हा याला जोडीने ठेवायला पाहिजे. ज्याचे एक तोंड   प्रवेश दाराकडे असायला पाहिजे आणि दुसर्‍याच तोंड विपरित दिशेकडे असावे.    
 
3. जेव्हा शो केसमध्ये ठेवायचे असेल : तुम्ही मूर्त्यांना शो केसमध्ये ठेवू शकता. या परिस्थितीत हे आवश्यक आहे की मूर्त्यांमधील अंतर किमान 1 इंचीचा असावा.  
 
4. चामड्याच्या वस्तू ठेवू नये : सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर कुठल्या वस्तूंना ठेवायला पाहिजे. जसे गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.  
 
5. गणपतीची सोंड नेहमी उजवी बाजूस नसावी : जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी. 
 
6. जर सोंड उजवीकडे असेल तर : उजव्या सोंडेचे गणपतींकडे विशेष लक्ष्य ठेवावे लागतात, त्यांना फार सोळ्याची गरज असते.. आणि हे सर्व सोळं घरात होणे फारच अवघड असते म्हणून या सोंडीचे गणपती मंदिरात मिळतात. घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवावी.