शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

ग्रहांची अनिष्टता दूर करण्यासाठी दान करा!

WD
कुंडलीतील ग्रह अनि‍ष्ट असतील अथवा प्रतिकुल असतील तर ते आपल्या प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न करू शकतात. अशा वेळी‍ होणारी कामे ही लांबणीवर पडते. ग्रहांची अनिष्टता नष्ट करण्यासाठी ग्रहांना विशिष्ट वस्तू दान करून त्यांची शांती करावी लागते.

सूर्य (रविवार): गहू, तांब्याची भांडी, तूप, गुळ, लाल कपडे, कन्हेरचे फूल, सोने, गायीचे वासरू दान केले जाते.

चंद्र (सोमवार): पांढरा कपडा, मोती, चांदी, तांदूळ, साखर, दही, शंख, पांढरे फूल दान केले जाते.

मंगळ (मंगळवार): मसूर, तूप, गुळ, लाल कपडा, गहू, केशर, तांबे, लाल फूल दान केले जाते.

बुध (बुधवार): मूग, तूप, हिरवा कपडा, चांदी, फूल, कास्यांचे भांडे, हस्तदंत व कपूर दान केले जाते.

गुरु (गुरुवार): चनादाळ, हळद, पिवळे वस्त्र, गुळ, पिवळे फूल, तूप व सोन्याची दागिने गुरु ग्रहाला दान केले जाता‍‍त.

शुक्र (शुक्रवार): चांदी, तांदूळ, दूध, पांढरे वस्त्र, तूप, पांढरे फूल, धूप, अगरबत्ती, इत्र, चंदन आदींचे दान केले जाते.

शनि (शनिवार): काळ्‍या रंगाचे वस्त्र, अख्ये उडीद, लोखंड, तेल, काळे फूल, कस्तूरी, काळी तिळ, चमडे, काळी कांबळचे दान केले जाते.

राहु (शनिवार): काळे-निळे वस्त्र, कांबळ, मोहरीचीदाळ, ऊलनचे कपडे काळी तिळ व तेल आदी दान केले जाते.

केतु (मंगलवार): सात धान्य, काजळ, झेंडा, लोकरीचे वस्त्र, तिळ आदींचे दान केले जाते.

विशेष : आपल्या यथाशक्तीनुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक वस्तू ग्रहाचा वार पाहून दीन दुबळ्यांना दान केले जाते.