बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2016 (17:26 IST)

घरातील टेन्शन पळवण्यासाठी हे सोपे उपाय करून बघा

जर घरातील वातावरण अशांत असेल तर त्याच्या नकारात्मक परिणाम देखील तुमच्या आयुष्यात पडतो. तर आता घरातील सुख शांती आणण्यासाठी काही सोपे उपाय ज्योतिषात दिले आहे, ते तुम्ही नक्की करून बघा.  
 
1. घरातील देवघरात प्रत्येक मंगळवारी पंचमुखी दिवा लावायला पाहिजे आणि दररोज कापूर देखील लावायला पाहिजे. असे केल्याने घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते.  
 
2. गुरुवार आणि रविवारी गूळ आणि तूप एकत्र करून कंड्यांना जाळायला पाहिजे, असे केल्याने घरातील वातावरण शांत होण्यास मदत मिळेल. 
 
3. प्रत्येक दिवशी कणीक मळताना त्यात एक चिमूट मीठ व बेसन मिसळायला पाहिजे. मान्यता आहे की असे केल्याने  घरातील तणाव दूर होते आणि घरात सुख शांतीचे वातावरण निर्मित होत.  
 
4. रात्री झोपण्याअगोदर पितळ्याच्या भांड्यात भिजलेला कापूर जाळायला पाहिजे, यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.  
 
5. आठवड्यातून एक दिवस घरात कंडे जाळून गुग्गुळाची धुनी द्या, ज्याने घरात शांतीचे वातावरण राहील.