मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: चेन्नई , सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (10:39 IST)

चांदोमामाला (सुपरमून) आज ग्रहण

सुपरमून अर्थात गडद लाल रंगाच्या पुर्ण चांदोमामाला आज ग्र्रहण लागणार आहे.

चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीच्या अगदी जवळच्या बिंदूवर असेल तेव्हाच सुपरमून दिसण्याचा योग जुळून येतो. भारतीय वेळेनुसार रात्री ८.२१ वाजता सुपरमूनचे दर्शन घडेल. भारतात काही ठिकाणी चंद्र अस्ताला जात असताना हे दृश्य बघता येईल. दिल्लीत पहाटे ५.४३ वाजता चंद्रग्रहण दिसू शकेल. तेजोमय असा सुपरमून दुर्बिणीने अधिक प्रकाशमान दिसेल.  खग्रास चंद्रग्रहण आणि सुपरमून असा दुर्मीळ योग खगोलप्रेमींना पहावयास मिळणार आहे.