गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जाणून घ्या कोणती रास आहे आपली पर्फेक्ट सेक्स पार्टनर!

मेष (मार्च 20 ते 19 एप्रिल) मेष राशी असलेले आत्मनिर्भर आणि ऊर्जावान असतात, त्यांना हवं असलेलं ते मिळवतात. अधिक सेक्स इच्छा असल्यामुळे हे आपल्या पार्टनरला उघडपणे प्रेम प्रदर्शित करतात आणि हे 
आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. काही नवी आणि गंमतशीर करणे यांचा छंद असतो. वृषभ राशी असलेले लोकं आपल्यासाठीच बनले आहेत. योग्य सेक्स पार्टनर्स- सिंह, धनू, मिथुन, तुला, कुंभ.
वृषभ (20 एप्रिल ते 20 मे) वृषभ राशी असलेले जातक रोमँटिक आणि कामुक असतात. यांना टच करायला व अनुभवाला खूप आवडतं. म्हणून हे सेक्सपूर्वी खूप वेळपर्यंत कामक्रीडा करतात. हे इमोशनल असतात. एकदा सेक्सची सुरुवात झाली की ते परम आनंद मिळवल्याशिवाय राहत नाही. योग्य सेक्स पार्टनर्स- कन्या, मकर, मीन, वृश्चिक, मीन.

मिथुन (21 मे ते 21 जून) शूरवीर असणारे हे लोक प्रेम करण्यात तज्ज्ञ असतात. हे लवकर बोर होतात म्हणून यांना खूप प्रेम करणार्‍या पार्टनरची गरज असते. हे लोकं स्पष्टवादी, रचनात्मक आणि धोका पत्करणारे असतात. योग्य सेक्स पार्टनर्स- तूळ, कुंभ, मेष, सिंह, धनू.
कर्क (22 जून ते 22 जुलै) कर्क राशी असलेले अंतरंग असतात. यांना प्रेम करायला आणि पार्टनरची इच्छा पूर्ण करायला आवडतं. सेक्स करण्यापूर्वी हे आपल्या पार्टनरची शारीरिक आणि मानसिक स्थिती जाणून घेतात. यांना पार्टनरला कसं खूश करायचे हे छान जमतं. हे प्रेमाचे भुकेले असतात. योग्य सेक्स पार्टनर्स- वृश्चिक, मीन, मिथुन, कन्या, मकर.

सिंह (23 जुलै ते 22 ऑगस्ट) ही भावुक आणि आकर्षक रास आहे. हे जरा विनोदी, जरा कठोर आणि सेक्सी असतात. जरासे ड्रामेबाजही असतात. पार्टनरने साथ दिला तर जमून प्रेमाचा वर्षाव करतात. योग्य सेक्स पार्टनर्स- मेष, कर्क, मिथुन, तुला, कुंभ.
कन्या (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) हे लोकं तार्किक आणि व्यावहारिक असून यांना नियमितपणा आवडतो. हे आधी अपेक्षा जाणून घेतील आणि त्याप्रमाणे वागतील. पण समोरच्याला निराश करणार नाही. सुरक्षित आणि आरामात असल्यावर हे कामुक होतात. आपल्या पार्टनरचे खूप लक्ष ठेवतात. योग्य सेक्स पार्टनर्स- वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन.

तूळ (23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर) पार्टनरकडे लक्ष देणे आणि त्याला खूश ठेवणे यांना आवडतं. हे जरा रोमँटिक असतात, प्रेमात खूप पुढे जाऊ इच्छितात पण यांना जरा स्तुतीची अपेक्षा असते.  हे बडबडे आणि प्रेमळ असतात. योग्य सेक्स पार्टनर्स- मिथुन, कुंभ, मेष, सिंह, धनू.
वृश्चिक (23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) हे शानदार सेक्स पार्टनर असतात. हे कामुत्तेजक आणि कामुक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट एकदा तरी ट्राय करू पाहतात. हे प्रेम देण्यात आणि घेण्यात विश्वास ठेवतात. हे पार्टनरवर जरा हक्क गाजवतात. योग्य सेक्स पार्टनर्स- कर्क, मीन, मिथुन, कन्या, मकर.

धनू (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) हे उत्तेजक आणि कल्पनारम्य असतात. यांना प्रेम करायला खूप आवडतं पण लवकर बोरही होतात. हे आत्मनिर्भर असतात आणि एकटे राहण्यापासून घाबरत नाही. हे आपलं मन कुठेही रमवतात. यांना स्वत:वर कोणाचेही नियंत्रण पसंत नाही. योग्य सेक्स पार्टनर्स- मेष, सिंह, कन्या, तुला, कुंभ.
मकर ( 22 डिसेंबर ते 19 जानेवारी) हे जरा लाजाळू असतात म्हणून ज्यांच्यासोबत भविष्य घालवण्याचा विचार नसेल त्यांच्यासोबत सेक्स करणे यांच्यासाठी अवघड आहे. ये नियम पाळणारे, विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. सेक्समध्ये यांची रुची जरा कमीच असते म्हणून यांच्याकडून अधिक अपेक्षा करणे योग्य नाही. पण हे निष्ठावंत आणि दयाळू असतात आणि आपल्या पार्टनरला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. योग्य सेक्स पार्टनर्स- वृषभ, कन्या, कर्क, वृश्चिक, मीन.

कुंभ (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) हे बेडरूममध्ये नवीन प्रयोग करणारे असतात. यांना साहसिक प्रयोग करायला आवडतं. जरा वाकड्यात जाणारे तरी भावुक आणि उत्साही स्वभावाचे असतात. यांना गंमत करण्याचा छंद असतो. योग्य सेक्स पार्टनर्स- मिथुन, तुला, सिंह, धनू.
मीन ( 19 फेब्रुवारी ते 20 मार्च) मीन राशी असलेले स्वत: पुढाकार घेत नाही, यांना प्रोत्साहनाची गरज असते. यांना सेक्सबद्दल विशेष लगाव नसल्यामुळे प्रेमाविना यांना जिंकणे शक्य नाही. तरी यांच्या राशीला योग्य पार्टनरला हे भरपूर प्रेम ‍देतात आणि संतुष्ट ठेवतात. योग्य सेक्स पार्टनर्स- कर्क, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ.