गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 12 एप्रिल 2016 (17:30 IST)

तळहातवरील भाग्यरेष (Fate Line) दाखवेल तुमचे भाग्य..

कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात सुख-समाधानी व्हायचे असेल तर त्याला कष्टाबरोबरच भाग्याची साथ पाहिजे, असे म्हटले जाते. यासाठी मनुष्य भविष्याचा आधार घेत असतो. भविष्य पाहण्याचे विविध पर्याय आणि माध्यमे आहेत. त्यापैकी सहज आणि सोपी पद्धत म्हणजे हस्तरेषेवरुन भविष्य पाहणे, याला अधिक पसंती असते. हस्तरेषेमध्ये भाग्यरेषेला खूप महत्व आहे. ही रेष जेवढी सक्षम तेवढे तुमचे भविष्य सक्षम. म्हणूनच जाणून घेऊयात कुठे आणि कशी असते आपली भाग्यरेष...
 
कुठे असते भाग्यरेष? 
भाग्यरेष ही हृदयरेषेच्या मध्यापासून सुरु होऊन मणिबन्ध रेषेपर्यंत जाते. या रेशेचा उगम बहुतकरुन मध्यमा किंवा शनीपर्वतापासून होतो. 
 
स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर जी रेषा मध्यमा अर्थात पंच्याच्या मधील बोटाच्या खालून सुरु होते आणि वरपर्यंत जाते तिलाच भाग्यरेष म्हणले जाते. अनेक जातकांच्या हातावर ही रेष मणिबंध अर्थात मनगटापर्यंत गेलेली दिसते. 

भाग्यरेषेचे असे मिळते फळ : 
पारंपरिक शास्त्रानुसार ज्या जातकाच्या हातामध्ये ही भाग्यरेष जितकी ठळक आणि लांब असते तितके त्याचे भविष्य उज्वल असते. मात्र, हीच भाग्यरेष जर फिकट असेल तर त्याचे भाग्य उज्वल असू शकत नाही किंबहूना अशुभ मानले जाते.
 
१ असे समजले जाते की ज्या बिंदूवर भाग्यरेषेला दुसरी रेषा छेद देते त्यावेळी कात्री तयार होते अर्थात त्या जातकाच्या भाग्यावर परिणाम होतो. त्याची संपत्तीत घट होते आणि त्याला इतरही दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. 
 
२ जर भाग्यरेष शनिपर्वतापासून ते मणिबंधापर्यंत असली तरीही ती तुटक तुटक असल्यास तुमचे भाग्य उज्वल नाही, असे समजावे. अशी तुटक-तुटक रेष वेळोवेळी तुमचे भाग्य सोडून देते, असे दर्शवते.