शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 22 एप्रिल 2014 (16:44 IST)

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना

मेष – ज्याची रास मेष आहे त्यांनी कुलदेवतेची व गणपतीची उपासना करावी. भाग्यरत्न पोवळे रत्न तांब्यात वापरावे. शुभवार : मंगळवार.


वृषभ वृषभ राशिवाल्यांनी देवीची उपासना करावी. मंगळवार, शुक्रवार किंवा अष्टमीचा उपवास करावा. भाग्यरत्न हिरा सोन्यात वापरणे. शुभवार : शुक्रवार


मिथून भाग्य उजळण्यासाठी भगवान, श्रीकृष्णाची व विष्णूची उपासना करावी बुधवार व्रत करावे. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार

कर्क – या राशी वाल्यांनी भगवान शंकराची उपासना करावी. दूध व तांदूळ तसेच चांदी दान करावी.
सिंह – भगवान सुर्यनारायणाची उपासना, विष्णू पूजा. भाग्यरत्न माणिक सोन्यात. शुभवार रविवार
कन्या – या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची आराधना करावी. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार

तूळ – या लोकांनी जगदंबेची उपासना करावी. भाग्यरत्न हिरा शुभवार : शुक्रवार

वृश्चिक – या राशीवाल्यांनी भाग्यप्राप्तीकरीता व संकट निवारण्याकरीता सोळा सोमवार व्रत करावा. भाग्यरत्न : पोवळ,  शुभवार : मंगळवार.

धनु – या राशीच्या लोकांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना कायम करावी. शुभवार गुरूवार, शुभरंग पिवळा, गुलाबी.

मकर – या राशीच्या लोकांनी शनिवार उपवास करावा. भाग्यरत्न : निलम,  शुभवार : शनिवार. 



कुंभ – या राशीच्या लोकांनी मारूतीची उपासना करावी. भाग्यरत्न : निलम, शुभवार :  शनिवार. 

मीन -या राशीवाल्यांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना करावी. भाग्यरत्न : पिवळा पुष्कराज सोन्यात, शुभवार : गुरूवार